भाजपाची चांदी; खिंड लढवणाऱ्या काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांनी निवडणुकीआधीच ‘हात’ सोडला..

भाजपाची चांदी; खिंड लढवणाऱ्या काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांनी निवडणुकीआधीच ‘हात’ सोडला..

Lok Sabha Elections : निवडणूक म्हटली की पक्षांतराची खेळ सुरूच असतो. कधी तिकीट (Lok Sabha Elections) मिळणे म्हणून तर कधी पक्षावरील नाराजी तर कधी अन्य कारणांमुळे नेते मंडळी पार्टी बदलत राहतात. आताची लोकसभा निवडणूक सुद्धा याला अपवाद नाही. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी आणि जाहीर झाल्यानंतर अनेकांनी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्या आहेत. काँग्रेस, भाजप या राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षात सुद्धा पक्षांतर सुरू आहे. आज आपण अशाच दहा हाय प्रोफाईल नेत्यांची माहिती घेणार आहोत ज्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.

काँग्रेस मधील 16 नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. या व्यतिरिक्त भारत राष्ट्र समितीचे 8, आम् आदमी पार्टी आणि युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टीचे प्रत्येकी 2, तसेच बीजू जनता दल, बहुजन समाज पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, तेलुगू देसम पार्टी, तृणमूल काँग्रेस पक्षातील नेते भाजपात सामील झाले. या व्यतिरिक्त एक अपक्ष आमदाराने भाजपात प्रवेश केला.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने 370 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने भाजपने अशा नेत्यांना तिकीट दिले आहे जे दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत. निवडणुकी आधी दुसऱ्या पक्षातून आलेले 34 नेते भाजपवासी झाले आहेत.

Loksabha Election 2024 : बॉक्सर विजेंद्रचा काँग्रेसला अलविदा; ‘पंजा’ सोडून भाजपचं कमळ घेतलं हाती

काँग्रेस पार्टीचे हुशार आणि डिबेट मध्ये विरोधी पक्षाच्या प्रवक्त्याना घाम फोडणारे गौरव वल्लभ यांनी (Gaurav Vallabh) आज काँग्रेसला जोरदार धक्का दिला. काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांत अशोक तंवर, भर्तुहरी महताब, बीबी पाटील, किरण कुमार रेड्डी, परनीत कौर, नवीन जिंदाल, जितीन प्रसाद, अनिल अँटनी, रणजीत सिंह चौटाला, विजेंदर सिंह आणि सौमेंदू अधिकारी या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला.

अशोक तंवर यांनी आम् आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देते भाजपात प्रवेश केला. आता तंवर हरियाणातील सिरसा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. याआधी तंवर हरयाणा काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष आणि भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत.

बिजू जनता दलात भर्तुहरी महताब सहा वेळा खासदार राहिले आहेत. प्रसिद्ध व्यवसायिक नवीन जिंदाल यांनी सुद्धा काँग्रेसची साथ सोडत भाजपाचा झेंडा हाती घेतला. 2004 आणि 2009 च्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि जिंकले सुद्धा. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री एके अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी देखील काँग्रेस सोडली आहे. 2004 आणि 2009 च्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर लढले होते.

Pune Loksabha : ‘माझा विश्वास मतांच्या विभाजनावर नाही तर पुणेकरांवर’ धंगेकरांना भलताच कॉन्फिडन्स

पश्चिम बंगालमधील तमलुक मतदारसघांतील तृणमूल काँग्रेस खासदार सौमेंदु अधिकारी यांनी देखील काही दिवसांपूर्वी भाजप मध्ये प्रवेश केला. ते सुवेंदू अधिकारी यांचे बंधू आहेत ज्यांनी 2021 च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव केला होता. भाजपने 2019 लोकसभा निवडणुकीत 437 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते यातील 23 उमेदवार दलबदलू होते. यातील 13 जणांनी विजय मिळवला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज