पद्म पुरस्कार 2026 जाहीर, महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, भिकल्या धिंडा, श्रीरंग लाड, रोहित शर्माला पद्मश्री
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी ४० व्यक्तींना पद्मश्री प्रदान केले जाणार आहेत.
केंद्र सरकारने आज रविवार (दि. 25 जानेवारी २०२६) रोजी पद्म पुरस्कारांची घोषणा केली. (Election) कला, साहित्य, समाजसेवा, उद्योग तसेच अन्य वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. दरम्यान, या वर्षी महाराष्ट्रातील काही मान्यवरांनाही पद्म पुरस्काराचा बहुमान मिळाला आहे. परभणीचे श्रीरंग लाड, रघुवीर खेडकर, पालघरच्या जव्हार तालुक्यातील वाळवंडा या अती दुर्गम भागात राहणाऱ्या भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कारांना समन्मानित करण्यात येणार आहे. आदिवासी समाजातील तारपा या पारंपरिक वाद्यसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच क्रिकेटर रोहित शर्माला याला पद्मश्री जाहीर झालाय. 113 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तर पाच जणांना पद्मविभूषण आणि 13 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेत.
कर्नाटकच्या अंके गौडा आणि महाराष्ट्राच्या आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्रीने सन्मानित केले जाईल. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचे भागवदास रायकवार आणि जम्मू-काश्मीरचे ब्रिजलाल भट यांना पद्मश्रीने सन्मानित केले जाईल. छत्तीसगडचे बुद्री थाती आणि ओडिशाचे चरण हेम्ब्रम, उत्तर प्रदेशचे चिरंजी लाल यादव आणि गुजरातचे धर्मलाल चुन्नीलाल पंड्या हे देखील याच श्रेणीत आहेत.
मामुली शब्द विलासरावांना भोवला?, 1995 च्या निवडणुकीत करावा लागला होता पराभवाचा सामना
केंद्र सरकारने 45 मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी निवड केली असून प्रजासत्ता दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व सन्मानितांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 4 भूमीपुत्रांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये, लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांचाही समावेश आहे. लोककला, लोकनाट्य जपण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान होत आहे. दरम्यान, सन 2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांना पहिला जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला होता.
यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी
1. अंके गौडा
2. आर्मिडा फर्नांडीझ
3. भगवानदास रायकवार
4. भिक्ल्या लाडक्या धिंडा
5. ब्रिजलाल भट
6. बुधरी ताटी
7. चरण हेमब्रम
8. चिरंजी लाल यादव
9. धर्मलाल चुन्नीलाल पंड्या
10. गफरुद्दीन मेवाती जोगी
11. हेली वॉर
12. इंद्रजित सिंग सिद्धू
13. के. पाढानिवेल
14. कैलासचंद्र पंत
15. खेम राज सुंदरियाल
16. कोल्लक्कायल देवकी अम्माजी
17. कुमारसामी थंगराज
18. महेंद्रकुमार मिश्रा
19. मीर हाजीभाई कासमभाई
20. मोहन नगर
21. नरेश चंद्र देव वर्मा
22. निलेश विनोदचंद्र मांडलेवाला
23. नुरुद्दीन अहमद
24. ओथुवर थिरुथनी स्वामीनाथन
25. पद्म गुरमेट
26. पोखिला लेखथेपी
27. पुननियामूर्ती नटेसन
28. आर. कृष्णन
29. रघुपत सिंग
30. रघुवीर तुकाराम खेडकर
31. राजस्थानपती कलिअप्पा गौंडर
32. रामा रेड्डी मामिदी
33. रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले
34. एस.जी. सुशीलम्मा
35. सांग्युसांग एस. पोंगेनर
36. शफी शौक
37. श्रीरंग देबा लाड
38. श्याम सुंदर
39. सिमांचल पात्रो
40. सुरेश हनगावडी
41. तगा राम भिल
42. तेचि गुबिन
43. तिरुवरूर बक्तवत्सलं
44. विश्वबंधू
45. यमनाम जत्रा सिंग
