आम्हाला भाजपमुक्त प्रभु श्रीराम पाहिजे; चोरांचा नायनाट करणार; उद्धव ठाकरे कडाडले

मुंबईत काढलेल्या रामरक्षा आंदोलनातून शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट भाजप आणि पंतप्रधान मोदीवर प्रहार केले आहेत.

News Photo   2026 07 05T174414.074

आज बारा वर्ष झालं. आपण ज्या गोष्टींसाठी (BJP) मेहनत घेतली त्या व्यक्तींनी कट्टर कडवट हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसेनेला संपवण्यासाठी अपझल खानासारखा विडा त्यांनी उचला आहे. नको ती लोक आज सत्ता भोगत आहेत. खरा हिंदू आज भरडला जातोय. अयोध्या झाकी है काशी मथूरा बाकी है अशी घोषणा दिली होती. आज भीती वाटते अयोध्या इतकी लुटली तर या काशी मथुरेच काय होणार? असं म्हणत शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट भाजप आणि पंतप्रधान मोदीवर प्रहार केले आहेत. ते रामरक्षा महाआरती या सभेत बोलत होते.

बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, तेव्हा देशातील एकच मर्द शिवेसनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदूंच्या पाठीशी उभा राहिला होता. हिंदू भयग्रस्त होता, हिंदू आक्रमित होता, तेव्हा आधार शोधत होता, त्यावेळेला शिवसेनेचा भगवा शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांच्या हातात दिला. गैरफायदा घेतला गेला, नको ती लोकं सत्ता भोगत आहेत, हिंदू आजही भरडला जातोय,असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दानचोरी प्रकरणानंतर राममंदीर ट्रस्टचा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड अन् जमिनीवर बसून होणार मोजणी

नरेंद्र मोदी ही व्यक्ती पंतप्रधानपदी बसली आणि बसल्यानंतर कट्टर, कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला नष्ट करण्यासाठी जणू काही अफजलाखानी विडा उचलला. का उचलला कारण हिंदुत्वाचा गैरफायदा घ्यायचा होता. हिंदुत्वाचा गैरफायदा घेताना शिवसैनिक, एकच शिवसेना देशात अशी आहे, समोर उभी राहून निधड्या छातीनं त्यांना प्रश्न विचारु शकेल. काय वातावरण होतं, अयोध्या तो झांकी है, काशी मुथरा बाकी है. मला आता भीती वाटायला लागली, ही अयोध्येची झांकी असेल तर काशी मथुरा किती लुटतील, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

बारा वर्षात आपल्या भगव्याचं सरकार तिकडं आलं असताना आपल्याला वाटत होतं, अब हिंदू मार नही खायेगा, मात्र हिंदूंना लुटणारं सरकार तिथं बसलंय हे आपलं दुर्भाग्य आहे. पहिली सुरुवात शं‍कराचार्यांनी केली, केदारनाथातील सोनं लुटलं गेलं. मध्यप्रदेशातील मुख्यमंत्र्यांवर उज्जैनमधील जमीन लुटली गेल्याचे आरोप झाले. बद्रीनाथमध्ये पण चोरीच्या बातम्या येत आहेत.

अयोध्येत एक आयएएस ऑफिसर बोलतात, आईचे सोन्याचे दागिने वितळवले आणि एक किलोचा सोन्याचं मुलामा असलेलं रामचरितमानस गायब झालं, नऊ नऊ तास बसवलं जातं पण उत्तर दिलं जात नाही. शिवसेनेनं फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही पैसे दिलेले, चांदीच्या विटा दिलेल्या, कुठे गेलं सगळं, असा सवाल उद्ध ठाकरेंनी केला.

follow us