Government Schemes : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा मिळणार?

Government Schemes : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा मिळणार?

Government Schemes : शेतीला (agriculture)पुरेसं पाणी मिळण्यासाठी महाराष्ट्र (Maharashtra)राज्यामध्ये सुक्ष्म सिंचन योजना राबवली जाते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनासाठी अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री कृषी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन योजनेंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदान दिले जाते. तर इतर शेतकऱ्यांसाठी (Farmer)45 टक्के अनुदान दिले जात आहे.

शिवसेनेच्या कोट्यातील आठ जागा भाजपला अन् चार राष्ट्रवादीला? ’32’ मतदारसंघात ‘कमळाचे’ उमेदवार

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा (Pradhan Mantri Krishi Irrigation Yojana)लाभ देशातील सर्व शेतकऱ्यांना मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही जातीची अट नाही. मात्र अर्जदार शेतकरी एससी, एसटी प्रवर्गातील असेल, तर त्याला जात प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.

पंकजांच्या नेतृत्त्वाला शाहांचा कौल; वन टू वन चर्चेमुळे बीडमधील समीकरणं बदलणार

योजनेसाठी आवश्यक पात्रता
– शेतजमिनीचा सातबारा प्रमाणपत्र आणि आठ प्रमाणपत्र
– अर्जदाराचे आधार कार्ड
– अर्जदार एससी किंवा एसटी प्रवर्गाचा असल्यास जातीचा दाखला असावा.
– शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी विद्युत जोडणी आवश्यक
– वीज बिलाची पावती
– पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेतच शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळेल.
– शेतकऱ्याने 2016-17 च्या आधी या योजनेचा लाभ घेतलेला असेल, तर पुढील 10 वर्ष त्याला त्या सर्वे नंबरसाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
– शेतकऱ्यांचं आधार कार्ड
– ओळखपत्र
– शेतकऱ्याच्या जमिनीचं कागदपत्र
– बँक पासबूक
– पासपोर्ट साईज फोटो
– मोबाईल नंबर

लाभ कसा मिळणार?
– फॉर्म भरल्यानंतर शेतकऱ्याला सुक्ष्म सिंचन प्रणाली खरेदी करण्यासाठी पूर्व मंजुरी मिळेल.
– या मंजुरीनंतर शेतकरी अधिकृत विक्रेत्याकडून सुक्ष्म सिंचन प्रणाली खरेदी करु शकतो.
– सिंचन प्रणाली खरेदीच्या पावत्या 30 दिवसाच्या आत ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवरती अपलोड कराव्या.

योजनेंतर्गत अनुदान किती मिळणार?
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान :
1) अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी : 55 टक्के
2) इतर शेतकरी : 45 टक्के

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा?
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करुन आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube