फुल बॉडी चेकअप केले नाही? मग सावध व्हा, तपासणी करा अन् ‘या’ आजारांना शोधा

फुल बॉडी चेकअप केले नाही? मग सावध व्हा, तपासणी करा अन् ‘या’ आजारांना शोधा

Full Body Checkup : आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना आरोग्याकडे (Health) लक्ष देता येत नाही. शरीरात एखादा आजार हळूहळू वाढत असतो परंतु आपल्याला त्याची जाणीव होत नाही. ज्यावेळी हा आजार गंभीर रूप धारण करतो त्यावेळी आपल्याला लक्षात येते परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणून वेळोवेळी फुल बॉडी चेकअप करणे (Full Body Checkup) गरजेचे असते. फुल बॉडी चेकअपचेही अनेक फायदे आहेत. यामुळे शरीरात काही आजार असतील तर वेळेवर लक्षात येते.

अनेक आजार असे असतात जे कोणतेही लक्षणं दिसत नसतानाही शरीरात वाढत असतात. तपासणी केल्यानंतर या आजारांची माहिती मिळते. त्यामुळे वेळेवर उपचार करता येतात आणि या आजारांवर मात करता येते. अशात तुम्हालाही माहिती असायला पाहिजे की तुम्हाला कोणत्या तपासणीची गरज आहे. सध्या आपण सर्वच टॉक्सिक आणि प्रदूषित वातावरणात राहत आहोत. खराब खानपान आणि अव्यवस्थित लाईफस्टाईलमुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने फुल बॉडी चेकअप करणे उपयुक्त ठरेल. यामुळे शरीरात होणाऱ्या जोखीमांची शक्यता कमी होते.

आठवड्यातून 60 तासांपेक्षा जास्त काम करताय? मग, आरोग्य नक्कीच धोक्यात; धक्कादायक अहवाल उघड

फुल बॉडी चेकअपचे फायदे

हेल्थ एक्स्पर्ट डॉ. समीर भाटी सांगतात एखादी टेस्ट किंवा स्कॅन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कॅन्सरची तपासणी (Cancer Test) करण्यासाठी ब्लड टेस्ट करावी लागतं नाही यासाठी वेगळ्या तपासण्या होतात. हार्टसाठी बीपी टेस्ट, शुगर टेस्ट आणि हृदयाचा ईको आणि ज्या लोकांच्या कुटुंबात हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे त्या लोकांच्या हृदयाची सिटी अँजिओग्राफी केली जाते.

एखाद्या आजाराची माहिती सुरुवातीलाच मिळाली तर त्यावर वेळेत उपचार करता येतो. यासाठी योग्य वेळी योग्य टेस्ट होणे गरजेचे आहे. आजार आहे किंवा नाही याची खात्री करायची असेल तर तुम्हीही या तपासण्या करू शकता.

हृदयासाठी तपासण्या

ब्लड प्रेशर, कॉलेस्ट्रॉल, ईसीजी टेस्ट याद्वारे हृदयाची स्थिती कशी आहे याची माहिती कळते. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव करता येतो. हृदयाशी संबंधित काही समस्या असल्यास तुम्ही जेव्हा दवाखान्यात जाता तेव्हा डॉक्टरांकडून यातील काही तपासण्या केल्या जातात. या तपासण्यांच्या माध्यमातून हृदयाचे आरोग्य कसे आहे याची ढोबळ माहिती मिळते.

लिव्हरसाठी कोणत्या तपासण्या आवश्यक

लिव्हर फंक्शन टेस्ट करून तुम्ही लिव्हरच्या आरोग्याच्या बाबतीत माहिती घेऊ शकता. किडनीच्या आजारांची माहिती घेण्यासाठी केएफटी तपासणी करून घेणे गरजेचे ठरते. लिपिड प्रोफाईल आणि युरीन टेस्ट शरीरातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड यांचे मोजमाप करते. ब्लड आणि युरिन टेस्टच्या माध्यमातून याची माहिती कळते. यामुळे वेळेत उपचार करणे शक्य होते.

सावधान! रोजच्या ‘या’ सवयींनी मिळतंय कॅन्सरला आमंत्रण; जाणून घ्या, कॅन्सर कसा टाळाल..

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी तपासणीमुळे हाडांतील कमकुवतपणा किंवा ऑस्टिओपोरोसिस आजाराचा शोध घेतला जाऊ शकतो. टीएसएच टेस्टच्या माध्यमांतून थायरॉईड योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही याची माहिती घेतली जाते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube