उन्हाचा तडाखा वाढला! गर्भवती महिलांनी घ्यावी या गोष्टींची काळजी, तज्ज्ञांकडून जाणून घ्या हेल्थ टिप्स
Pregnant women उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांनी आपली विशेष काळजी घेणे गरजेचे असतं.
heat of sun increased! Pregnant women take care of these things, learn health tips from experts : उन्हाळ्याचे दिवस सर्वच लोकांसाठी काळजी घेण्यासारखे असतात. यामध्ये आता एप्रिलमध्ये उन्हाचा तडाखा आणखी वाढला असून उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांनी आपली विशेष काळजी घेणे गरजेचे असतं. कारण या दिवसांमध्ये डीहायड्रेशन आणि अशक्तपणा यासारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे आहार तज्ज्ञांकडून जाणून घ्या काही हेल्थ टिप्स….
काय आहेत गर्भवतीसाठी हेल्थ टिप्स?
हायड्रेटेड रहा – उन्हाळ्यामध्ये शरीराला सर्वात जास्त पाण्याची गरज असते. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्या. त्याचबरोबर शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक आणि ताज्या फळांचा रस तसेच टरबूज या सारखे फळे खा जेणेकरून शरीर हायड्रेट राहील.
सकाळी हलका आणि पौष्टिक नाष्टा घ्यावा –
गर्भवती महिलांनी सकाळच्या नाष्ट्यामध्ये फळ खाणं चांगलं मानलं जातं. ज्यामध्ये टरबूज, खरबूज, सफरचंद, केळी यासारखे फळे शरीराला विटामिन्स आणि मिनरल्स आहे, त्याचबरोबर तुम्ही हलका नाश्ता म्हणून दलिया, ओट्स किंवा दूध देखील घेऊ शकता.
दुपारी संतुलन भोजन घ्या –
गर्भवती महिलांनी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुपारच्यावेळी संतुलित आहार केला. त्यामध्ये भाजी-पोळी, वरण-भात त्यांचा समावेश असेल. त्यासोबतच हिरव्या भाज्या आणि सॅलड नक्की घ्या. त्यामध्ये काकडी, टोमॅटो, गाजर, बीट यासारखे कंद वापरा.
सांगायचं नाश्ता हिंदी घ्या –
तर सायंकाळच्या वेळी हेल्दी नाश्ता घ्या. त्यामध्ये तळलेले भाजलेले पदार्थ नसावेत. या ऐवजी सॉटेड पनीर, क्रिस्पी हरभरे किंवा स्प्राउट्स खाऊ शकता. त्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं. जे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे.
रात्रीचा आहार हलका ठेवा –
तसेच गर्भवती महिलांनी रात्रीच्या वेळी खिचडी, वरण-भात यासारखे पदार्थ आहारात घ्यावे, त्याचबरोबर हलक्या भाजी-पोळी सोबत हिरव्या पालेभाज्या खाणे योग्य राहील. रात्रीच्या वेळी जास्त जड आहार पचन होणे अवघड असते.
लाईफस्टाइल वर लक्ष द्या –
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सामान्य लोकांचा गर्भवती महिलांना देखील मेहनतीच्या कामापासून सांगा दूर राहावं. थोडं फार चांगलं ठीक आहे. त्याचबरोबर ढगळ आणि आरामदायी कपडे घाला. जेणेकरून उन्हापासून वाचाल.
काय करू नये –
वरती आपण वाचलं की, काय करावे. मात्र आता गर्भवती महिलांनी काही गोष्टी टाळाव्यात. ज्यामध्ये मसालेदार पदार्थ, तळलेले भाजलेले आणि बाहेरील पदार्थ टाळा. कॅफीन आणि जास्त साखर असणारे पदार्थ कमी घ्या. उष्ण पदार्थ टाळा जेणेकरून आई आणि बाळाच्या आरोग्यावरचा विपरीत परिणाम होणार नाही.