NLC इंडियामध्ये बंपर भरती सुरू, महिन्याला 30 हजार रुपये मिळणार पगार, कोण करू शकतं अर्ज?
Government Job Recruitment 2024: सध्या अनेकजण सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, सरकारी नोकरी मिळवणं हे अवघड झालं आहे. जर तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या (Government Job ) शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड (Neyveli Lignite Corporation Limited) म्हणजेच NLC इंडिया ही भारत सरकारने नव्याने स्थापन केलेली कंपनी आहे. याच कंपनीने आता भरती प्रक्रिया सुरू केली आहे. 12वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. दरम्यान, ही भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख काय? कोण करू शकतो अर्ज? याच विषयी जाणून घेऊ.
रक्षा खडसेंनी मतदारसंघात एक रुपयाचेही काम केलं नाही; शिंदे गटाच्या आमदाराची टीका
कोणत्या पदासाठी किती भरती?
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडने औद्योगिक कामगार, लिपिक सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता यासारख्या विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 34 पदे रिक्त पदांसाठी ही भरती आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता 8 पदे, लिपिक सहाय्यक 17 पदे, औद्योगिक कामगार 9 पदे अशा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही 25 मार्च 2024 पासून सुरू झालेली आहे. उमेदवार 24 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
या पदभरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑऩलाईन अर्ज करता येणार आहे. nlcindia.in या कंपनीच्या अधिकृत वेबसाईलटा भेट देऊन उमेदवार भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या साइटवर तुम्हाला भरती प्रक्रियेसंबंधी सर्व अपडेट्स मिळतील. इच्छुक उमेदवारांनी कोणताही विलंब न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.
Shaitan: काळी जादू दाखवायला आर. माधवन तुमच्या घरी येतोय; कधी आणि कुठे पाहाल सिनेमा?
पात्रता काय असेल?
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे अभियांत्रिकीची पदवी असणं आवश्यक आहे. तसेच, लिपिक सहाय्यकांसाठी, उमेदवार हा पदवीधर असावा, तर औद्योगिक कामगारांसाठी या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा आयटीआयसह 12 वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गासाठी नियमानुसार वयात सवलत देण्याची आली आहे.
पगार किती असेल?
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडमधील कनिष्ठ अभियंत्यांचे प्रारंभिक वेतन 38000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. तर, औद्योगिक कामगार आणि लिपिक सहाय्यकासाठी निवडलेल्या उमेदवारांना 30000 रुपये पगार मिळेल.
किती शुल्क ?
कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणीसाठी 595 रुपये आणि ST, SC आणि माजी सैनिकांसाठी 295 रुपये शुल्क आहे.
लिपिक सहाय्यक आणि औद्योगिक कामगारांच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 486 रुपये आणि एससी एसटी इत्यादी उमेदवारांना 236 रुपये भरावे लागतील.
तथापि, केंद्र सरकारने सुरू केलेल्या या विविध पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 24 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करावेत, असे सांगण्यात आले आहे.