PCMC मध्ये विविध पदासांठी मेगा भरती, महिन्याला मिळणार 60,000 रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

PCMC मध्ये विविध पदासांठी मेगा भरती, महिन्याला मिळणार 60,000 रुपये पगार, कोण करू शकतं अर्ज?

PCMC Bharti 2024: जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल आणि उत्तम पगाराच्या नोकरीच्या (Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. दरम्यान, या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? याच विषयी जाणून घेऊ.

Darshan Thoogudeepa: प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याला मर्डर केसमध्ये अटक, पोलिसांकडून चौकशी सुरू 

एकूण पदे – 201

पदांचा तपशील –
वैद्यकीय अधिकारी – 67
स्टाफनर्स – 67
बहुउद्देशीय सेवक – 67

शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी –
1. एमबीबीएस पदवी किंवा बी.ए. एम. एस उत्तीर्ण आश्यकक
2. इंडियन मेडिकल कौन्सिलकील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक
3. एमबीबीएस पदवी उमेदवारांना प्राधान्य राहिलं.
4. अनुभव : मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन झाल्याच्या दिनांकापासून पुढील अनुभव असल्यास प्राधान्य

Rinku Rajguru : रिंकू राजगुरूचा टँक टॉपमधील लूक, चाहत्यांना लावलं वेड 

स्टाफनर्स –
1. बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक
2. जी.एन.एम किंवा बीएसस्सी उत्तीर्ण असणे आश्यक
3. स्टाफनर्स पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य

बहुउद्देशीय सेवक –
1. बारीवा सायन्स उत्तीर्ण असणे आवश्यक
2. पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कौर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
3. बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यू) (पुरूष) या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य

पगार –
1. वैद्यकीय अधिकारी –
एमबीबीएस 60,000 रुपये प्रतिमहिना
बीएएमएस – 25,000 मानधन + 15000 कामावर आधारित मोबदला.
2. स्टाफनर्स – 20000 रुपये प्रतिमहिना
3. बहुउद्देशीय सेवक – 18000 रुपये प्रतिमहिनाल

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 12 जून 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2024

अधिकृत वेबसाईटला : www.pcmcindia.gov.in

या भरतासीठी उमदेवारांनी दिलेल्या मुदतीपर्यंत आपला अर्ज आवश्यक कादपत्रांसह खालील पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
पिपंरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष, पिंपरी – 411018

आवश्यक कागदपत्रे-
10वी परीक्षेची मार्कशीट, अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, डियन मेडिकल कौन्सिलती नोंदणी, पासपोर्ट आकाराचा फोटो, जन्मतारीख प्रमाणपत्र आवश्यक आहे.

महत्वाचं म्हणजे, अर्ज भरतांना चुकीची माहिती भरल्यास किंवा उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज