जुमल्याचं नाव गॅरंटी, आता भाजप चारशे पार नाही, तडीपार होणार; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

जुमल्याचं नाव गॅरंटी, आता भाजप चारशे पार नाही, तडीपार होणार; आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

Aditya Thackeray On BJP : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करत आहे. आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मोदी सरकारवर (PM Modi) जोरदार टीका केली. भाजप चारशे पार नाही, तर अबकी बार भाजप तडीपार होणार, अशी टीका त्यांनी केली.

चारशे सोडा हे दोनशेही पार करणार नाही… रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल 

अहमदनगर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा समारोप आज झाला. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार पक्षाचे) अध्यक्ष शरद पवार, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, रोहित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अभिषेक कळमकर यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे नेते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

राहुल गांधींचा स्क्रिप्ट रायटर भाजपचा; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका 

यावेळी संबोधित करतांना आदित्य ठाकरे म्हणाले, भाजप चारशे पारची घोषणा देतेय, पण त्यांच्या चारशे काय दोनशेही जागा निवडणूक येणार नाहीत. अबकी बार भाजप तडीपार होणार आहे. द. भारतातील तमिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश सारख्या राज्यात भाजपच्या जागा निवडून येतील, अशी स्थिती नाही. दक्षिण भारतात भाजपचा सुफडा साफ होणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मोदींविरोधात असंतोष
बिहार, राजस्थान, झारखंड या राज्यातही तशीच परिस्थिती आहे. हेमंत सोरेने यांच्या पाठीमागे ईडी लावली. झारखंड आता भाजपची हकालपट्टी करेल. केजरीवालांना ईडीने अटक केली. त्यामुळं दिल्लीत मोदींविरोधात वारं तयार झालं. त्यामुळं भाजप दोनशे जागाही पार करू शकणार नसल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली.

भाजपने हुकूमशाही केली
आता भाजप सरकार परवडणारं नाही. दहा वर्षात भाजपचे आपण फक्त अत्याचार पाहिले. या सरकारने फक्त हुकूमशाही केली. आता भाजपचं सरकार येणार नाहीच. पण, आलं तर ते तुमच्या घरात घुसतील, अशी भीती आदित्य ठाकरेंनी केली.

जुमल्याचं नाव गॅरंटी
भाजप अच्छे दिन येणार असं सांगून सत्तेत आलं. मोदी सरकारने खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात येतील, असं सांगितलं. मात्र, 15 लाख रुपये आले नाही. महागाई कमी करू, नोकऱ्या देऊ असं सांगितलं. मात्र, आज बेरोजगारी वाढली. महागाई वाढली. सरकारने जननेतला उल्लू बनवलं, आता तर त्यांनी जुमल्याचं नाव गॅरंटी ठेवल्याचं टीका ठाकरेंनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube