Amravati : नवनीत राणा पिछाडीवर, कॉंग्रेसच्या बळवंत वानखडेंची 24739 मतांनी आघाडी

Amravati : नवनीत राणा पिछाडीवर, कॉंग्रेसच्या बळवंत वानखडेंची 24739 मतांनी आघाडी

Amravati Loksabha : विदर्भातील सर्वात हॉट मतदारसंघ असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) आणि कॉंग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांच्यात काट्याची लढत सुरू आहे. अमरावती सध्या नवनीत राणा पिछाडीवर आहेत. कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांना आतापर्यंत 2 लाख 92 हजार 040 मते मिळाली असून त्यांनी 24739 मतांनी आघाडी घेतली आहे.

Satara Loksabha : उदयनराजेंनी वचपा काढलाच! शशिकांत शिंदेंना धूळ चारली, विजयानंतर भावूक 

नवनीत राणा यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दर्यापूर विधानसभेचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे हे मैदानात होते. आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करत दिनेश बूब यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळं अमरावतीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत वानखडे यांना आतापर्यंत 2 लाख 92 हजार 040 मते मिळाली आहेत. तर नवनीत राणांना 2 लाख 67 हजार 301 मते मिळाली असून त्या 24739 मतांनी पिछाडीवर आहेत.

ठाण्याचा बालेकिल्ला शिंदेंचाच, ठाकरेंचा शिलेदार राजन विचारे मोठ्या पराभवाकडे, नरेश म्हस्के ठरले जायंट किलर 

तर दिनेश बुब यांना 38 हजार 240 मते मिळाली आहेत. तर आनंदराज आंबेडकर यांना
7253 मते मिळाली आहेत.

नवनीत राणा यांनी 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर त्यांनी भाजपसोबत महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यामुळं त्यांच्याविषयी मतदारांमध्ये नाराजी पसरली होती. त्याचा फटका त्यांना बसतांना दिसत आहे.

दरम्यान, आतापर्यंतच्या टप्प्यात नवनीत राणा मागे पडल्या आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीच्या शेवटच्या फेरीपर्यंत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube