इंडिया आघाडी म्हणजे सव्वीस पक्षांची खिचडी; फडणवीसांची घणाघाती टीका

इंडिया आघाडी म्हणजे सव्वीस पक्षांची खिचडी; फडणवीसांची घणाघाती टीका

Devendra Fadnavis on Congress : माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांच्या प्रचारार्थ रविवारी (28 एप्रिल) माढ्यात देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांची सभा झाली. या सभेला संबोधित करतांना त्यांनी इंडिया आघाडीवर (India Alliance) सडकून टीका केली. इंडिया आघाडीत एकत्रित आलेले सव्वीस पक्ष म्हणजे खिचडी आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.

तुमच्या एकीचे बळ मतांमध्ये दाखवा, फडणवीसांकडून निंबाळकरांच्या विजयाची जबाबदारी दोन्ही शिंदेंवर 

विकासाकडे मोदीचं घेऊन जाऊ शकतात
फडणवीस म्हणाले, ही निवडणुक ग्रामपंचाय, नगरपरिषद, विधानसभेची निवडणूक नाही. तर ही लोकसभेची निवडणूक आहे. पुढची पाच वर्ष कोणाच्या हातात देश द्यायया हे ठरवणारी निवडणूक आहे. विश्वगुरू नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) शिवसेना (शिंदे गट), मनसे, रासपा आणि इतरही घटक पक्ष आहेत. विकासाकडे केवळ मोदीचं घेऊन जाऊ शकतात. त्यामुळं सर्वच मोदींच्या नेतृत्वात एकत्रित आलेले आहेत, असं फडणवीस म्हणाले.

घरातील मंगळसुत्राची किंमत नाही, त्यांनी दुसऱ्याच्या मंगळसुत्राबद्दल काय बोलावं ? राऊतांची घणाघाती टीका 

सव्वीस पक्ष म्हणजे खिचडी
राहुल गांधींच्या नेतृत्वात एकत्रित आलेले पक्ष सव्वीस पक्ष म्हणजे खिचडी आहे. एकीकडे मोदींची विकासाची ट्रेन आहे. त्या ट्रेनला मोदींचं इंजिन आहे. त्या इंजिनाला वेगवेगळ्या पक्षाचे डबे लागले आहेत. त्या डब्यात शेतकरी, मजूर, ओबीसी, अल्पसंख्यांक अशा प्रत्येक माणसाला बसायला जागा आहे. सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी मोदींच्या नेतृत्वात वेगाने पुढे जातेय. मात्र, विरोधकांच्या ट्रेनला डब्बेच नाहीत, अशी टीका फडणवीसांनी केली.

कॉंग्रेस कर रद्द करू शकलं नाही…
फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदींनी ऊस उद्योगासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. साखर कारखानदारीवरील इन्कम टॅक्सचा प्रश्न कॉंग्रेस सरकार सोडवू शकले नाही. शरद पवार हे शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय मंत्र्यांना भेटायचे आणि आता आम्हाला शब्द मिळाला आहे, आता इन्कम टॅक्स रद्द होणार असं सांगायचे. पण, काँग्रेस सरकारने कारखान्यावर लावलेला कर कधीच रद्द केला नाही. मात्र, देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 हजार कोटी रुपयांचा इनकम टॅक्स माफ करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे, असं फडणवीस म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube