देशात काटे की टक्कर! एनडीए 275 तर इंडिया आघाडी ‘इतक्या’ जागांवर पुढे
Lok Sabha Election 2024 : देशात सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान झाल्यानंतर विविध संस्थेने एक्झिट पोल (Exit Poll 2024) जाहीर केले होते. या एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र आज जाहीर होत असलेल्या निकालात एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये कट टू कट फाईट दिसून येत आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या कौलानुसार देशात एनडीए 275 जागांवर पुढे असून इंडिया आघाडी देखील 218 जागांवर पुढे आहे तर इतर 23 जागांवर पुढे आहे. उत्तर प्रदेशमध्ये एनडीए 40 जागांवर आघाडीवर असून इंडिया देखील 40 जागांवर आघाडीवर आहे तर राज्यात महायुती 18 जागांवर आणि महाविकास आघाडी 26 जागांवर आघाडीवर आहे. तर संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील 3 हजार मतांनी पुढे आहे.
ECI च्या 406 जागांच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, भाजप 194 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 76 जागांवर आघाडीवर आहे, तर समाजवादी पार्टी 30 जागांवर आघाडीवर आहे.
बातमी अपडेट होत आहे
मतमोजणीआधीच भाजपने सूरत जिंकलं; देशातील पहिला निकाल भाजपाच्या खात्यात