मोदींच्या विधानाने चर्चेत आलेलं मंगळसूत्र, स्त्री-धन अन् महिलांचा संपत्तीतील हक्क…
Lok Sabha Election PM Modi statement About Mangalsutra : मंगळसूत्र हा स्त्रीयांसाठी अत्यंत संवेदनशील विषय असतो. कारण एकतर ते पतीच्या नावाने घातले जातं. तसेच स्त्री-धन म्हणून त्यावर त्या स्त्रीचा हक्क असतो. मात्र सध्या एकीकडे सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने मंगळसूत्र ( Mangalsutra ) करणं दुरापास्त झालेय तर दुसरीकडे हेच मंगळसूत्र लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुद्दा बनलय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election ) आणि मंगळसूत्र यांचा संबंध कसा? चला तर जाणून घेऊ हा प्रकार नेमका काय आहे? तसेच स्त्री-धन म्हणजे काय? कायद्यानुसार विवाहित आणि अविवाहित महिलांना संपत्तीमध्ये कीती हक्क मिळतो.
भाजपकडून निवडणुकीत गैरव्यवहार करण्याचा प्रत्यन, ‘आप’ने केला गंभीर आरोप
तर लोकसभा निवडणूक आणि मंगळसूत्र यांचा संबंध सुरू झाला तो पंतप्रधान मोदींच्या राजस्थानमधील प्रचार सभेमध्ये त्यांनी केलेल्या एका विधानामुळे हे विधान असं होतं की, जाहिरनाम्यात म्हटल्याप्रमाणे कॉंग्रेस तुमच्या घरी किती पैसा आहे, किती सोनं आहे, किती चांदी आहे या गोष्टी शोधून काढेल. ही संपत्ती वाटली जाईल. अगदी महिलांचं मंगळसूत्रही हिसकावलं जाईलं. त्यावरून सध्या सत्ताधारी विरोधकांमध्ये टीका-टीपण्णी सुरू आहे.
स्त्री-धन म्हणजे काय? कायद्यानुसार विवाहित आणि अविवाहित महिलांना संपत्तीमध्ये हक्क…
स्त्रीधन म्हणजे स्त्रीला लहानपणापासून आणि विशेषतः लग्नात मिळालेल्या भेटवस्तू, दाग-दागिने, संपत्ती. असं ढोबळमानाने सांगितलं जातं. मात्र कायद्यामध्ये याची विस्तृत व्याख्या आहे. कारण कायद्यानुसार वडीलोपार्जित तसेच पतीकडील संपत्तीमध्ये महिलेला हक्क आहे. ज्यामध्ये वस्तूंसह स्थावर आणि जंगम मालमत्तेचा ही समावेश आहे. तसेच लग्नानंतर देखील स्त्रीच्या माहेरवरून मिळालेल्या भेटवस्तू, दाग-दागिने यावर सासरच्या मंडळींचा नाही तर फक्त त्या स्त्रीचा अधिकार असतो. सासरचे मंडळी केवळ त्याचे ट्रस्टी असतात.
Madha Loksabha : देवेंद्र फडणवीसांना पुन्हा धक्का! आणखी एक धनगर नेता शरद पवारांच्या गोटात…
हिंदू महिलांना हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956 कलम 14 आणि हिंदू विवाह अधिनियम 1955 कलम 27 अंतर्गत हा अधिकार मिळतो. त्यामध्ये वडिलोपार्जित आणि लग्नानंतर पतीकडील भेटवस्तू आणि संपत्तीचा समावेश आहे. तर इतर धर्मांबाबात सांगायचं झालं तर हिंदू कायदा हा हिंदूंसह जैन बौद्ध आणि शीखांना लागू आहे. तर इस्लामिक आणि ख्रिश्चन यांच्यासाठी याबाबत वेगळा कायदा अस्तित्वात आहे.