पक्ष गेला, चिन्ह गेलं पण जनतेच्या कोर्टात ठाकरेंचीच शिवसेना खरी! ‘या’ गोष्टी ठरल्या गेमचेंजर
Lok Sabha Maharashtra Result Factor Behind Thackery’s Victory : मंगळवारी (4 जून) ला देशात लागलेला लोकसभा निवडणुकांचा निकाल भाजपसाठी जेवढा धक्कादायक होता. तेवढाच इंडिया आघाडी आणि विरोधकांसाठी तो अनपेक्षित देखील होता. त्यात महाराष्ट्रात भाजपला आणि पर्यायाने महायुतीला फटका बसणार हे देखील निश्चित होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालामधील ( Lok Sabha Maharashtra ) सर्वच पक्षांच्या कामगिरीनंतर त्यांच्या यश आणि अपयशाची वेगवेगळी कारण मीमांसा केली जात आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे ( Thackery’s Victory ) यांच्या पक्षाने केलेली कामगिरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महाविकास आघाडी सोबत असणाऱ्या ठाकरेंच्या यशामागील नेमकी कारण काय? शिंदेंचा पराभव करत ठाकरेंच्या विजयासाठी कोणत्या गोष्टी गेमचेंजर ठरल्या? पाहुयात…
Election Result : सहा राज्यांनी घेतली भाजपाची शाळा; राजधानी दिल्लीची ‘वाट’ही केली अवघड
उद्धव ठाकरे या निवडणुकीत उतरले तेव्हा त्यांचा स्वतः चा पक्ष चिन्ह काहीही त्यांच्या जवळ नव्हतं. त्यामुळे त्यांच्याकडे गमवायला देखील काहीही नव्हतं असंच म्हणावं लागेल. मात्र त्यांनी न डगमगता ठाम भूमिका घेत महाराष्ट्रभर एकहाती पक्षाचा प्रचार केला. निवडणूक आयोगाने दिलेली मशाल पेटवून दोघे बापलेक झपाटल्यासारखे महाराष्ट्रात फिरले. स्वतःच्या तब्येतीच्या मर्यादा असतानाही स्वतःला झोकून दिले. त्या ठाकरेंच्या पदरात जनतेने यशाचे माप टाकले आहे.
ठाकरेंच्या विजयात ‘या’ गोष्टी ठरल्या गेमचेंजर
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्वाधिक 21 जागा लढविल्या होत्या. त्यातील नऊ जागा जिंकल्या आहेत. निवडक लोक सोबत असताना ठाकरेंनी हा विजय खेचून आणला त्यासाठी काही गोष्टी निर्णायक ठरल्या त्यात ठाकरे पिता-पुत्रांनी राज्यात फिरत झपाट्याने प्रचार केला. केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर चौफेर टीका केली. पक्षफुटीनंतर राज्यभर ठाकरे कुटुंबाबद्दलच्या सहानुभूतीचा त्यांना मोठा फायदा झाला.
मराठवाड्याचा ‘जरांगे पाटील फॅक्टर’; दिग्गज नेत्यांचा पराभव, भाजपला केलं हद्दपार
यासह शिंदे आणि भाजपकडून ठाकरेंवर कॉंग्रेससोबत जाण्यावरून तसेच मुस्लिम मतदारांचा आधार घेण्यावरून प्रचंड टीका झाली. मात्र या निवडणुकीने मुंबईत आणि महाराष्ट्रात एक नवा राजकीय फॉर्म्युला सेट केला आहे. मुस्लीम आणि मराठी एकत्र येऊ शकतात. कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची मते एकमेकांकडे ट्रान्सफर केली जाऊ शकतात, हे गणित या निकालाने सोडवून दिले आहे. मुस्लिमांना देखील ठाकरे एक अश्वासन नेते वाटले. त्यामुळेच अनेक ठिकाणी ठाकरेंचं मुस्लिम समाजाने देखील स्वागत केल्याचं प्रचारादरम्याान दिसून आलं.
पक्ष गेला, चिन्ह गेलं पण जनतेच्या कोर्टात ठाकरेंचीच शिवसेना खरी!
त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फुटली, ४० आमदार गेले. पक्षाचे नावही गेले. धनुष्यबाणही जवळ राहिला नाही. मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. तपास यंत्रणांचा दबाव आला. तरी देखील ठाकरेंच्या या यशाने मुंबईत नव्या राजकीय खेळाची बीजेही रोवली गेली आहेत. बाळासाहेबांची शिवसेना संपली असे म्हणणाऱ्यांना हा निकाल हेच उत्तर आहे. त्यामुळे ठाकरे यांचा पक्ष गेला चिन्हही गेलं. मात्र या निवडणुकीतील त्यांच्या विजयाने आणि शिंदेंच्या पराभवाने जनतेच्या कोर्टात ठाकरेंचीच शिवसेना खरी असल्याचं सिद्ध केलं आहे.