तिकीट नाकारणं धक्कादायक, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, मी आता…; राजेंद्र गावित काय म्हणाले?

तिकीट नाकारणं धक्कादायक, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, मी आता…; राजेंद्र गावित काय म्हणाले?

Rajndra Gavit on Hemant Savara : पालघर लोकसभेची जागा अखेर भारतीय जनता पक्षाच्या पारड्यता गेली आहे. या ठिकाणी भाजपने (BJP) माजी मंत्री विष्णू सावरा (Vishnu Savera) यांचे पुत्र डॉ. हेमंत सावर (Hemant Savara) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं पालघरमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले शिंदे गटाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावि यांना मोठा धक्का बसला. दरम्यान, सावरा यांच्या उमेदवारीवर गावित यांनी प्रतिक्रिया दिली.

पवार कुटुंबातील मुलांशी लग्न केल्याने आम्ही पवार, सुप्रिया सुळे रक्ताने पवार 

पालघर लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारणे हा माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आणि दुःखद निर्णय असल्याची भावना गावित यांनी व्यक्त केली.

आज माध्यमांशी संवाद साधतांना गावित म्हणाले की, पालघर लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारले हा माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आणि स्वत:साठी दुःखद निर्णय आहे. हे खरे असले तरी माझ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि प्रचंड नाराजी निर्माण झाली. मला कार्यकर्त्यांचे फोन येत असून ते वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. माझे तिकीट कापले असले तरीही महायुतीचे जे उमेदवार आहेत, त्या उमेदवाराविषयी असलेली कार्यकर्त्यांमधील नाराजी आणि नैराश्य मी दूर करण्याचा प्रयत्न करेन. उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करूया, असं आवाहन गावित यांनी केलं.

डीआरडीओमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 127 पदांसाठी भरती सुरू, कोण करू शकतं अर्ज? 

दरम्यान, राजेंद्र गावित हे पूर्वी भाजपवासी होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीत लढले. मात्र पालघरची जागा शिवसेनेकडे जाताच गावित यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ​​शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयाही झाले होते. राजकीयदृष्ट्या ही एक प्रकारची अॅडजस्टमेंट मानली जात होती. यंदा ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी भाजप आग्रही होता. मात्र गावितांना पुन्हा संधी मिळणं फिक्स मानलं जात होत असल्याने ते घरवापसी करतील, अशी चर्चा होती. मात्र, भाजपने या जागेवर सावरा यांना उमेदवारी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube