प्रतिभा धानोरकर गड राखणार! चंद्रपूरमध्ये धानोकरकर 10 हजार मतांनी आघाडीवर
Chandrapur Lok Sabha : काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात (Chandrapur Lok Sabha Constituency) काँग्रेसच्या (Congress) पंजाचा करिष्मा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा सुरुवातीचा कल काँग्रेसच्या बाजूने आहे. सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) सुमारे 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
Elections Results : नाशिक, जळगाव, नंदूरबार अन् धुळ्यात कुणाची आघाडी? वाचा एका क्लिकवर…
प्रतिभा धानोरकर यांचे पती दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होतं. बाळू धानोरकरांच्या निधनानंतर प्रतिभा धानोरकरांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती .लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक्झिट पोलने चंद्रपूर लोकसभेतून आमदार प्रतिभा धानोरकरांनी आघाडी मिळेल तर भाजपचे उमेदवार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर असतील असा अंदाज वर्तवला होती. तेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. चंद्रपूर लोकसभेच्या पहिल्या फेरीत काँग्रेसच्या प्रतिभा धानेरकर यांनी भाजपचे दिग्गज उमेदवार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 10,803 मतांनी पराभव करत मोठी आघाडी घेतली आहे.
2019 मध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ जिंकून काँग्रेसचे दिवंगत नेते बाळू धानोरकर यांनी एकप्रकारे राज्यात काँग्रेसची लाज राखली होती. त्यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली. त्यामुळे आता त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना या जागेवरून उमेदवारी देण्यात आली आहे. याच मतदारसंघातून भाजपने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली होती. या जागेवर धानोरकर आणि मुनगंटीवार यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.
Elections Results : नाशिक, जळगाव, नंदूरबार अन् धुळ्यात कुणाची आघाडी? वाचा एका क्लिकवर…
मतमोजणीची पहिली फेरी-
1. प्रतिभा धानोरकर- काँग्रेस- 30,000
2. सुधीर मुनगंटीवार – भाजप – 19,197
3. राजेंद्र रामटेके – बसपा – 487
४. अवचित सयाम – जगोंपा – 106
5. अशोक राठोड – जविपा – 127
6. नामदेव शेडमाके – गोंगपा – 155
7. पूर्णिमा घोनमोडे – बरीसोपा – 39
8. राजेश बेळे – वंबआ- 638
9. वनिता राऊत – आभामप – 47
10. विकास लसंते – सराप- 41
11. विद्यासागर कोसर्लावार – भिसे – 61
12. सेवकदास बरके – पिपाइं (डे.) – 103
13. दिवाकर उराडे – अपक्ष – 126
14. मिलिंद दहिवले – अपक्ष – 70
15. संजय गावंडे – अपक्ष – 217
16. नोटा – 419
काँग्रेस- 10803 ने आघाडीवर
सध्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर आहेत. मात्र, अंतिम फेरीनंतर कोण विजयी कोणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्या अंतिम फेरीपर्यंत आघाडी कायम राखतात का, हेच पाहणं महत्वाचं आहे.