तू कोणाला जॅक, टॉमी देऊन नोकरी लागली का?, मल्हार पाटलांची ओमराजेंवर घणाघाती टीका

तू कोणाला जॅक, टॉमी देऊन नोकरी लागली का?, मल्हार पाटलांची ओमराजेंवर घणाघाती टीका

Dharashiv Loksabha : धाराशिव या मतदार संघातील राजकारण पाहिलं तर ते एका कुटुंबातील राजकीय संघर्ष म्हणता येईल असं आहे. पद्मसिंह पाटलांपासून सुरू झालेला राजकीय संघर्ष हा आज ओमराजे निंबाळकर आणि राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांच्यातही सुरू असल्याचं समोर आलं आहे. मल्हार पाटील यांनी  खासदार ओमराजे निंबाळकरांवर जोरदार टीका केली आहे.  तू कोणाला जॅक, टॉमी देऊन लागली का नोकरी? असा थेट घणाघात मल्हार पाटील यांनी केला आहे. धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ मल्हार पाटील प्रचारात उतरलेले आहेत. ते अनेकवेळा ओमराजे निंबाळकर यांच्यावर थेट टीका करतात. आजही त्यांनी ओमराजे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

राहुल गांधींची हुजरेगिरी तिकडे जाऊन कर

ओमराजे यांनी एका सभेत ’जय श्रीराम लागली का नौकरी असं वक्तव्य केलं होतं. त्याचा मल्हार पाटील यांनी जोरदार समाचार घेतला. मल्हार पाटील यांनी थेट अरे-तुरे या भाषेत ओमराजे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, “तू कोणाला जॅक, टॉमी देऊन लागली का नोकरी?, माझ्या धर्माबद्दल बोलू नको. तुला जी राहुल गांधींची हुजरेगिरी- नोकरी करायची आहे ती तिथे जाऊन कर”, अशा शब्दांत मल्हार पाटील यांनी ओमराजे निंबाळकरांवर प्रहार केला.

 

कुटुंबाचा राजकीय संघर्ष

दरम्यान आजच, मल्हार पाटील यांचे वडिल आणि तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राणा यावेळी म्हणाले, धाराशिवमध्ये मेडिकल कॉलेज मंजूर झाल्यानंतर ते दुसरीकडे नेलं हा आरोप विरोधी उमेदवाराकडून केला जातो. मात्र, हे मेडिकल दुसरीकडं नेलं हा आरोप करताना त्याचे पुरावे द्या. जर पुरावे दिले तर मी राजकारण सोडून देईल असं थेट आव्हान राणाजगजितसिंह पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिलं आहे. त्यानंतर आता मल्हार पाटील यांनीही ओमराजे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे राणा पाटील आणि ओमराजे यांच्या कुटुंबाचा राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज