मोदी हप्ता बहाद्दर, पंतप्रधान कार्यालय म्हणजे वसुली कार्यालय; आंबेडकरांचे टीकास्त्र

मोदी हप्ता बहाद्दर, पंतप्रधान कार्यालय म्हणजे वसुली कार्यालय; आंबेडकरांचे टीकास्त्र

Prakash Ambedkar Attack On PM Modi : राजकीय सुडापोटी मोदी सरकारने विरोधकांवर ईडी, सीबीआय अंतर्गत कारवाया केल्या अशी टीका विरोधक सातत्याने करत आहेत. याच मुद्द्यावरून आता आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) पंतप्रधान नरेंद्र मोदींव (Prime Minister Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) सडकून टीका केली आहे. मोदी सगळ्यात मोठे हप्ता हप्ता बहाद्दर आहेत. मोदींनी अनेकांच्या मागे केंद्रीय यंत्रणा लावल्या, पण एकालाही आतमध्ये घातलं नाही, असं आंबेडकर म्हणाले.

पंतप्रधानांनी हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवणं हे दुर्दैव, जितेंद्र आव्हाड मोदींच्या ‘त्या’ विधानावर संतापले 

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. यावेळी बोलतांना आंबेडकर म्हणाले की, मोदी सगळ्यात मोठे हप्ता हप्ता बहादूर आहेत. मोदींनी अनेकांच्या ईडी लावली. सीबीआय लावली. आयबी लावली. आयकर विभाग मागे लावला. यंत्रणा येत होत्या. नोटिसा दिल्या, छापे टाकले. पण एकाला आतमध्ये घातलं का? असा सवाल आंबेडकरांनी केला.

बिग बीं शेअर केला ‘अश्वत्थामा’चा दमदार लूक; सोशल मीडियावर ‘कल्की 2898 एडी’ची चर्चा 

आंबेडकर पुढं बोलतांना म्हणाले, संविधान म्हणते की जो कोणी भारतात जन्माला आला तो भारताचा नागरिक आहे. हे म्हणतात, कागद दाखवा. त्यामुळं पंतप्रधान कार्यालय हे आता मानवतेचे कार्यालय न राहाता हे आता वसुली कार्यालय झाले आहे, असंही आंबेडकर म्हणाले.

17 लाख हिंदू कुटुंब देश सोडून बाहेर गेले. ही माहिती खोटी आहे का, हे त्यांनी सांगावं. भाजप आणि नरेंद्र मोदी मुस्लिमांच्या विरोधात नाहीत. खरे तर मोदी हे येथील हिंदूंच्या विरोधात आहेत, असा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला.

स्मार्ट सिटी म्हणजे शहरातून दररोज कचरा उचलला गेला पाहिजे. स्मार्ट सिटी म्हणजे खड्डे नसलेला रस्ता असतो. मात्र आज शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही. तरुणांना रोजगार नाही, याकडं लक्ष न देता सरकार फालतू गोष्टींमध्ये लक्ष देत असल्याची टीका आंबेडकरांनी केली.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे २० हून अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वत: अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यासाठी त्यांनी या लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा सुरू केल्या आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube