माढ्यात नवा ट्विस्ट! शेकापमध्ये फूट, पवारांचा डावही उलटणार? युवा नेता अपक्ष लढण्याच्या तयारीत..

माढ्यात नवा ट्विस्ट! शेकापमध्ये फूट, पवारांचा डावही उलटणार? युवा नेता अपक्ष लढण्याच्या तयारीत..

Madha Lok Sabha Aniket Deshmukh prepare for Contest Independent : सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघ राज्यात चर्चेत (Madha Lok Sabha Constituency) आहे. येथील राजकारण प्रत्येक क्षणाला बदलत आहे. महायुतीने या मतदारसंघात रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर माढ्यातून कोण असा प्रश्न शरद पवारांसमोर होता. मग शरद पवारांनी महादेव जानकरांना हेरलं. त्यांच्याशी चर्चा केली. जानकर महाविकास आघाडीच्या गोटात जाणार याचा अंदाज येताच फडणवीसांनी डाव टाकला. जानकरांना अलगद आपल्याकडे घेत परभणीचं तिकीट घेतलं. त्यानंतर कसलेल्या पवारांनाही मोठा डाव टाकत महायुतीतील नाराज धैर्यशील मोहिते पाटलांच्या हाती तुतारी देत माढ्यातून उमेदवारी दिली.

परंतु, पवारांच्या याच डावामुळे काही नेते नाराज झाले आहेत. दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. फक्त नाराजीवरच ते थांबलेले नाहीत तर आता त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे.

माढ्यात पवार पॅटर्न! विजय मिळवताना घाम निघणार; सोलापुरचं मैदानही कठीण; चंद्रकांत पाटलांची कबुली

माढा लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून आधी महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु,जानकरांनी ऐनवेळी महायुतीकडून परभणीचं तिकीट मिळवलं. त्यानंतर भाजपातील धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळण्याआधी शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख यांची चर्चा होती. परंतु, पवार गटाने त्यांना डावलून मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश घडवला. त्यानंतर त्यांना उमेदवारीही जाहीर केली.

ज्यावेळी उमेदवार नव्हता त्यावेळी आमच्या नावाची चर्चा होती. परंतु, निष्ठावंत उमेदवार असताना भाजपकडून उमेदवार आयात केला आणि आमची फसवणूक केली अशा शब्दांत देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. मी जिंकण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असेही त्यांनी सांगितले. सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

जानकरांसाठीची ‘चार्टर्ड प्लेन’ पॉलिसी सफल; माढ्याची ‘गुड न्यूज’ संध्याकाळी सात वाजता सांगणार

कोण आहेत अनिकेत देशमुख?

अनिकेत देशमुख हे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत अनिकेत देशमुख उमेदवार होते. या निवडणुकीत फक्त 700 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. आता जर त्यांनी माढ्यातून अपक्ष उमेदवारी केली तर महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते त्यांची नाराजी कमी करण्यात आणि त्यांना माघार घ्यायला लावण्यात यशस्वी होतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज