फडणवीस आम्हाला मदत करत असतील तर आम्हीही लोकसभेला…;अभिजीत पाटलांचं मोठं विधान

फडणवीस आम्हाला मदत करत असतील तर आम्हीही लोकसभेला…;अभिजीत पाटलांचं मोठं विधान

Abhijit Patil Met Devendra Fadnavis : दोन दिवसांपूर्वी शरद पवारांचे विश्वासू अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर (Vitthal Cooperative Sugar Factory) जप्तीची कारवाई झाली होती. त्यानंतर आज त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) भेट घेतली. त्यामुळं राजकारणात एकच खळबळ उडाली.

शरद पवारांचा उमेदवार कसा हे माहितीये, पारनेरांना 2019 ची चूक सुधारण्याची संधी; विखेंचा लंकेंना टोला

बारामतीप्रमाणेच माढा लोकसभेची जागाही प्रतिष्ठेची झाली आहे. माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत तुतारी हाती घेतली. उत्तमराव जानकर यांनीही शरद पवार गटाला पाठिंबा दिला. अशा स्थितीत भाजपसमोर माढ्यात आपला उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान निर्माण झालं. त्यामुळं भाजपने आता पवारांचे निकटवर्तीय अभिजीत पाटलांना सोबत घेण्यासाठी चंग बांधला. पाटील यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी आपण भापजला लोकसभा निवडणुकीत मदत करणार, अशी भूमिका घेतली.

लहानपणीच एक स्वप्न पूर्ण होतंय …!, असं का म्हणतेय अमृता खानविलकर?, जाणून घ्या याबद्दल

ते म्हणाले, कारखान्याची साखर जप्त झाली आहे, हा विषय मी फडणवीस यांच्या कानावर घातला. त्यामुळे कारखान्यासाठी मदत करण्याचा त्यांनी शब्द दिला आहे. त्यांनी कारखान्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि ते आम्हाला मदत करतील अशी अपेक्षा आहे, असं पाटील म्हणाले.

कारखाना वाचण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्याची अट घातली का? असा प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले की, भाजप प्रवेशाबाबत त्यांनी चर्चा केलेली नाही. कारखान्याला मदत करण्यासंदर्भात आमच्यात चर्चा झाली. तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू, असा फडणवीस यांनी शब्द दिला आहे. ते आम्हाला मदत करत असतील तर लोकसभेला आम्ही देखील त्यांना मदत करू. कारखान्याला मदत झाली पाहिजे, त्यासाठी वाटेल ती किंमत आम्ही मोजालया तयार आहोत, असंही पाटील म्हणाले.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदार राम सातपुते यांच्यासाठी प्रचार सभा होत आहे. पाटील यांनी फडणवीस यांची भेट घेतली असल्यानं ते आज भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता बोलली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube