सुनीता केजरीवाल सांभाळणार आपच्या प्रचाराची धुरा, दिल्लीत रोड शो, अनेक राज्यात घेणार सभा…

सुनीता केजरीवाल सांभाळणार आपच्या प्रचाराची धुरा, दिल्लीत रोड शो, अनेक राज्यात घेणार सभा…

Loksabha Election 2024 : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सध्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत आहेत. त्यामुळं त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) आता लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या (आप) प्रचाराचे नेतृत्व (Sunita Kejriwal Election Campaign) करणार आहेत. त्या दिल्लीत रोड शो करून मतदारांना आकर्षित करणार असल्याची माहिती आहे.

धमाल कॉमेडीचा डबल डोस; या आठवड्यात ओटीटीवर पाहायला मिळणार ‘लापता लेडीज’ 

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने केजरीवाल यांना अटक केली. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं आता आपच्या निवडणूक प्रचाराची धुरा सुनीता केजरीवाल यांच्या खांद्यावर आली आहे. सुनीता केजरीवाल यांनी सीएम केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधारार्थ व्हिडिओमधून भाजपवर टीका केली. त्यानंतर रामलीला मैदानावरून प्रथमच इंडिया आघाडीच्या रॅलीला त्यांनी संबोधित केले. त्यानंतर आता सुनीता निवडणूक प्रचाराला गती देण्यासाठी रोड शो करणार आहेत. सुनीता केजरीवाल गुजरात आणि पंजाबमध्येही आप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

महाविकास आघाडी सरकारबद्दल फडणवीसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, मला अटक… 

दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांनी सांगितले की, आपच्या निवडणूक प्रचाराची सुरूवात दिल्लीतून होणार आहे. सुनीता केजरीवाल ह्या स्वत: रोडशो मध्ये सहभागी होणार असून आप उमेदवारांसाठी मते मागतील. त्याची सुरुवात उद्यापासून दिल्लीतून होणार आहे. 27 एप्रिल रोजी त्या रोड शो करणार आहेत. आपचे उमेदवार कुलदीप कुमार यांचा प्रचार सुनीत केजरीवाल करणार आहेत. पूर्व दिल्ली नंतर 28 एप्रिल रोजी पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातही त्या रोड शो करणार आहेत. सुनीता केजरीवाल पंजाब, हरियाणा आणि गुजरातचा दौरा करणार असल्याचं आतिशी यांनी सांगितलं.

यावेळी बोलतांना आतिशी यांनी केंद्र सरकारवर अनेक आरोप केले. त्या म्हणाल्या, भाजप शासित केंद्र सरकार आणि ईडीने लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक केली, जेणेकरून ते लोकसभा निवडणुकीत प्रचार करू शकणार नाहीत. पण आम्ही भाजपला ठणकावून सांगतो की, केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात दिल्लीतील लोक, पंजाबचे लोक आणि देशभरातील लोक निदर्शने करत आहेत.

कॉंग्रेससोबत आपची दिल्लीत युती
काँग्रेससोबत आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या ‘आप’ने पूर्व दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि नवी दिल्ली या जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर काँग्रेसने ईशान्य दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली आणि चांदनी चौक या जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube