पुरावेच नाही तर माणसंही गायब करण्याची कॉंग्रेसची परंपरा; उदयराजेंची कॉंग्रेसवर सडकून टीका

पुरावेच नाही तर माणसंही गायब करण्याची कॉंग्रेसची परंपरा; उदयराजेंची कॉंग्रेसवर सडकून टीका

Udayanraje Bhosale On Congress : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करत आहे. अशातच आता भाजपचे सातारा लोकसभेचे (Satara Lok Sabha) उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसल (Udayanraje Bhosale) यांनी कॉंग्रेसव (Congress) जोरदार हल्लाबोल केला. पुरावे गायब करण्याची कॉंग्रेसची परंपरा पहिल्यापासून आहे, पुरावे सोडून द्या, लोक गायब करण्याची परंपरा कॉंग्रेसची आहे, अशी टीका उदयराजेंनी केली.

“उद्धव ठाकरेंचा रस्ता अडवणारा अजून जन्माला आला नाही”; विनायक राऊतांचा राणेंवर तिखट प्रहार 

उदयनराजेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, चार सौ पार म्हणजे संविधान संपण्याचा प्रयत्न, अशी दिशाभूल काँग्रेसकडून केली जातेय. परंतु काँग्रेसनेच राज्यघटनेचा खात्मा केला आहे. आणीबाणी लागू केली, ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना लिहिली आहे, त्याच आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत करण्याचे काम काँग्रेसने केलं, अशा शब्दात उदयनराजे भोसलेंनी कॉंग्रेसवर टीका केली.

Shehnaz Gill : उफ्फ्फ तेरी अदा… शहनाज गिलचा हटके लूक 

पुढं बोलतांना ते म्हणाले, काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून पुरावे गायब करण्याची परंपरा आहे. पुरावे सोडून द्या, लोकांना गायब करण्याची काँग्रेसची परंपरा आहे, गायब होणं, हे सहजासहजी घडत नाही. काँग्रेसमध्ये एखादी व्यक्ती पुढे जात असेल तर अशी गायब होण्याची अनेक उदाहरणे देता येतील. हा योगायोग नक्कीच नाही. राजेश पायलट, माधवराव शिंदे, वाय.एस. रेड्डी हे सुध्दा काँग्रेसमधीलच होते, पण ते नावारुपाला आल्यानंतर त्यांचा अपघात झाला, असा आरोप उदयनराजेंनी केली.

राजेश पायलट हे अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षपदाचा फॉर्म भरण्यासाठी जात असताना त्यांचा अपघात झाला. माधवराव शिंदे यांचे नेतृत्व जनतेने स्वीकारले, त्यांचाही अपघात झाला, वायएस रेड्डी हे सुद्धा काँग्रेसमध्ये होते. ते त्यांच्या कार्याच्या माध्यमातून नावारुपाला आहो होते. त्यांचाही अपघात झाला. पुरावे सोडून द्या, माणसेच गायब केली, असं उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, या सगळ्यामागे काँग्रेस खरोखरच आहे का, असा प्रश्नही उदयनराजे यांना विचारला असता, त्यांनी या प्रश्नाला सावधपणे उत्तर दिले. प्रश्नच असा आहे की, कोणी केलं का केलं? पण माझं म्हणणं असं आहे की, जोपर्यंत ज्यांची नावं नावारुपाला येत नाहीत, तोपर्यंत काही झालेलं नाही. नावारुपाला आल्यानंतर असं घडलं, असा गंभीर आरोप उदयराजेंनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube