इंदिराजींची संपत्ती मिळवण्यासाठी वारसा कायदा रद्द केला; मोदींचा कॉंग्रेसवर आरोप
PM Narendra Modi on Congress : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) मध्य प्रदेशातील मुरैना येथे जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राजीव गांधींनी (Rajiv Gandhi) इंदिरा गांधींच्या संपत्तीसाठी वारसा कर कायदा रद्द केल्याचा आरोप मोदींनी केला.
Vishal Patil यांच्यासाठी काँग्रेसचे ‘लिफाफ्यातून’ गिफ्ट तयार… मेळाव्यातून दिली छुपी ताकद
मध्य प्रदेशातील मुरैना येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, आज मी तुमच्यासमोर वारसा कराबाबत एक मोठी वस्तुस्थिती मांडत आहे. ही वस्तुस्थिती डोळे उघडणारी आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर त्यांची मालमत्ता त्यांच्या मुलांकडे जाणार होती. पण त्याकाळी असा कायदा होता की मुलांना वारसाहक्काने संपत्ती मिळाली की त्यातील काही भाग सरकारला दिला जायचा. त्यावेळी काँग्रेसने तसा कायदा केला होता. त्यामुळं इंदिरा गांधींनंतर त्यांची संपत्ती राजीव गांधींकडे जाणार होती. पण, यातील काही संपत्ती सरकारकडे जाऊ नये, म्हणून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वारसा कायदा रद्द केला आणि संपत्ती वाचली, असा आरोप मोदींनी केला.
यूपीत तुष्टीकरणाच्या आधारावर दोन मुलांमध्ये मैत्री; PM मोदींची राहुल-अखिलेश यांच्यावर टीका
मोदी म्हणाले की, ही परिस्थिती स्वत:वर आली तर कायदा रद्द केला. आता सत्तेच्या लालसेपोटी हे लोक पुन्हा तोच कायदा आणू पाहत आहेत. आपल्या परिवाराची चार-चार पिढ्यांची बिना टॅक्सची संपत्ती मिळवल्यांतर आता ते सर्वसामान्यांची संपत्ती, तुमच्या मेहनतीची कमाई, जनतेने त्यांच्या मुलांसाठी ठेवलेली संपत्ती, त्यावर टॅक्स लावून ही संपत्ती लुटण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका मोदींनी केली.
भाजपसाठी देशापेक्षा काहीही मोठे नाही, तर काँग्रेससाठी कुटुंबच सर्वस्व आहे, अशी टीकाही मोदींनी केली. दरम्यान, मोदींनी केलेल्या या आरोपांना आता कॉंग्रेस काय प्रत्युत्तर देते, हेच पाहणं महत्वाचं आहे.