दोन राजपुत्रांमधील मैत्री ही तुष्टीकरणाच्या राजकारणावर आधारित; PM मोदींची राहुल-अखिलेश यांच्यावर टीका

दोन राजपुत्रांमधील मैत्री ही तुष्टीकरणाच्या राजकारणावर आधारित; PM मोदींची राहुल-अखिलेश यांच्यावर टीका

PM Narendra Modi on Congress : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) कॉंग्रेसवर (Congress) जोरदार टीका केली. संविधान निर्माण करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस वारंवार अपमान करत असल्याची टीका मोदींनी केली.

देवेंद्र फडणवीसांना धक्का! आणखी एक धनगर नेता शरद पवारांच्या गोटात…

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील आठ जागांवर मतदान होत आहे. त्यानिमित्ताने आज आग्रा येथील जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. राहुल गांधी आणि अखिलेश यांच्यावर निशाणा साधत पीएम मोदी म्हणाले, काँग्रेस पक्ष तुष्टीकरणाचे राजकारण करतो. उत्तर प्रदेशामध्ये दोन राजपुत्रांमधील ही तुष्टीकरणाच्या राजकारणावर आधारित आहे. हे दोघे मिळून आपल्या भाषणात ओबीसी-ओबीसी करत असतात आणि आपली मागच्या दाराने ओबीसींचे हक्क हिसकावून आपल्या व्होट बॅंकेला देऊ इच्छितात, असा आरोप मोदींनी केला.

सलमानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश आणि… ; मुंबई पोलिसांची धक्कादायक माहिती 

मोदी म्हणाले की, काँग्रेसने धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 27% OBC कोट्यातील आरक्षण हिसकाऊन धर्माच्या आधारावर आरक्षण देणार आहेत, अशी टीका मोदींनी केली.

काँग्रेस हा असा पक्ष आहे जो दररोज बाबासाहेबांचा अपमान करतो, संविधानाचा अपमान करतो आणि सामाजिक न्याय नष्ट करत आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात कधी कर्नाटकात, कधी आंध्र प्रदेशात, धर्माच्या आधारावर आरक्षणाचा पुरस्कार केल्याचं मोदी म्हणाले.

कॉंग्रेसच्या जागेवर मुस्लिम लीगचा प्रभाव
2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची 100% छाप आहे. काँग्रेसचा संपूर्ण जाहीरनामा केवळ व्होट बँक मजबूत करण्यासाठी समर्पित आहे. तर आमचे संकल्प पत्र देशाला बळकट करण्यासाठी समर्पित आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube