अहमदनगर जिल्ह्यावर पवारांचं लक्ष; विधानसभेच्या ‘या’ जागा ‘दादा’गट लढवणार, नाहाटांची माहिती

अहमदनगर जिल्ह्यावर पवारांचं लक्ष; विधानसभेच्या ‘या’ जागा ‘दादा’गट लढवणार, नाहाटांची माहिती

Assembly Election 2024 :  लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. यातच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या अहमदनगर जिल्ह्यावर शरद पवारांसह (Sharad Pawar) आता अजित पवारांनी देखील बारकाईने लक्ष ठेवलं आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रााष्ट्रवादीचा (Ajit Pawar) अजित पवार गटाने नगर जिल्ह्यातील आठ (Assembly Election) विधानसभा मतदारसंघांवर दावा केला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी दिली आहे.

शरद पवार गटाला यश ये चलने वाली नहीं गिरने वाली सरकार है…अखिलेश यादव यांचा लोकसभेत भाजपवर घणाघात

अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. 2019 च्या निवडणुकीमध्ये तब्बल सहा आमदार हे राष्ट्रवादीचे निवडून आले होते. मात्र, राष्ट्रवादीमधील पडलेल्या फुटीनंतर सद्यस्थितीला तीन आमदार अजित पवार गटाकडे तर दोन विद्यमान आमदार तर एक माजी आमदार हे शरद पवार गटाकडे आहे. यातच लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला चांगले यश मिळाले. यामुळे नगर जिल्ह्याकडे आता पुन्हा दोनही पवारांचं लक्ष लागून आहे.

 आठ जागांवर लढणार

यातच राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब नहाटा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. आधी जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी दिली.

हे आहेत आठ मतदारसंघ भाजप नेत्यांनी स्वत:चे कान साफ करावेत; राहुल गांधींच्या ‘हिंदू’ वक्तव्यावर राऊतांची मोठी प्रतिक्रिया

यावेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नहाटा म्हणाले की, राष्ट्रवादीने जिल्ह्यात आठ ठिकाणी दावा केला आहे. यामध्ये कोपरगाव अकोला श्रीरामपूर राहुरी श्रीगोंदा कर्जत जामखेड नगर शहर व पारनेर या आठ विधानसभा मतदार संघावार राष्ट्रवादीने दावा केला आहे. तसंच, राज्यात 90 जागांची मागणी राष्ट्रवादीने महायुतीकडे केल्याची माहिती देखील नाहाटा यांनी दिली. जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा अहवाल चार जुलैला होणाऱ्या प्रदेश समितीपुढे मांडणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

अजित पवारांवर टीका करणाऱ्यांना उत्तर

लोकसभा निवडणुकीचं खापर हे अजित पवारांवर फोडलं जात आहे. महायुतीतून अजित पवारांना बाहेर काढा अशी मागणी देखील भाजपचे पदाधिकारी खुलेआम करत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाला भाजपच कारणीभूत आहे. महायुतीमध्ये अजित दादा नसते तर नितीन गडकरी सोडून कोणही राज्यात निवडून आलं नसतं असा दावा यावेळी नहाटा यांनी केला. माहितीतील घटक पक्षातील वरिष्ठांनी आपापल्या पदाधिकाऱ्यांना समज द्यावी की अजित दादांवरती टीका टीपण बंध करावी. अन्यथा, येत्या काळामध्ये त्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल असा इशारा देखील यावेळी नहाटा यांनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज