‘लव्ह जिहाद’वरुन Ajit Pawar यांनी सुनावले… धार्मिक द्वेष पसरवू नका!

‘लव्ह जिहाद’वरुन Ajit Pawar यांनी सुनावले… धार्मिक द्वेष पसरवू नका!

मुंबई : उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधी कायदा राज्यात केला जाणार असल्याची वक्तव्ये काही लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र यातून धार्मिक द्वेष पसरला जाणार नाही, राज्यातल्या जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. सरकारने घटनाविरोधी आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केली आहे. जनतेच्या मूलभूत हक्क डावलण्याचा हा प्रकार आहे. लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा कोणलाही अधिकार नाही, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

सत्तारुढ पक्षाचे दादरमधील आमदारांनी गोळीबार केल्याचे प्रकरण राज्यात गाजले. या प्रकरणातील बॅलेस्टीक रिपोर्ट आला, ती गोळी आमदाराच्या बंदुकीतूनच सुटल्याचे स्पष्ट झाले. आता नवीनच माहिती पुढे आली की, अज्ञात व्यक्तीने हा गोळीबार केला. अज्ञात इसमाने गोळी झाडली असेल तर तो कोण होता, पोलिसांनी त्याचा तपास केला का ? सरळ सरळ आपल्या आमदारांना वाचवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. सरकार मनमानीपणे पोलीस दलाचा वापर करुन घेते आहे. सरकारमधील लोकप्रतिनिधीच गोळीबार करता म्हटल्या नंतर गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे धाडस वाढत आहे, गोळीबाराच्या अनेक घटना राज्यात घडल्या आहेत. राज्यात आता गँगस्टरने पुन्हा डोके वर काढल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, हे या गोळीबारातून समोर येते. क्षुल्लक कारणावरुन ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याने सातारा जिल्ह्यातल्या मोरणा (ता. पाटण) येथे गोळीबार केला. दोन स्थानिकांचा मृत्यू झाला, एकजण अत्यवस्थ आहे.

चोर म्हटल्यावर कारवाई होत असेल तर आम्ही… नाना पटोले बरसले – Letsupp

इगतपुरी तालुक्यातील वेठबिगारी प्रकरणाचा मुद्दा मी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. आदिवासी मुलींची वेठबिगारीसाठी विक्री होते, त्यांचे शोषण केले जाते. मी अशीही मागणी केली होती की, या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करावा. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालावं. एवढा गंभीर गुन्हा असताना शासकीय यंत्रणा मात्र गंभीर नाही. केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगापुढे अधिकारी हजरच झाले नाहीत. त्यामुळे नाशिक आणि नगरच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला हे शोभणारे नाही.

कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा सरकारने केली. मात्र दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपीला आळा घालण्यात सरकारला यश आलं नाही. पेपर फुटण्याच्या अनेक घटना सुध्दा उघडकीस आल्या. दहावीचा गणिताचा पेपर फुटला, विज्ञान तंत्रज्ञान विषयाचा पेपर फुटला. कॉपी पुरवण्यासाठी कर्मचाऱ्यांना मारहाण झाली. कॉपीमुक्त महाराष्ट्राची केवळ घोषणा करुन उपयोग नाही. त्याच्या अंमलबजावणीकडेही सरकारने लक्ष दिले पाहिजे.

(220) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube

follow us
  • fb
  • instagram
  • youtube