पवारांनी सुरू केलेला खेळ त्यांनीच संपवावा; अमित शाहंचे अति महत्त्वाचे विधान

  • Written By: Published:
पवारांनी सुरू केलेला खेळ त्यांनीच संपवावा; अमित शाहंचे अति महत्त्वाचे विधान

नवी दिल्ली : शरद पवारांनी आमचे मित्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आमच्यापासून तोडले. उद्धव ठाकरे आमचे मित्र होते, आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली होती. ते आमचे मित्र होते. आम्ही निवडणूक एकत्रपणे युतीत लढवली होती. ज्यांनी हे सगळं सुरु केलं त्यांनीच हा खेळ संपवावा असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंनी (Amit Shah) केले आहे. ते एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. (Amit Shah On Sharad Pawar & Uddhav Thackeray Relation )

अजितदादा लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये; भुजबळांनी हत्यार उपसलं

राज्यात सर्वकाही आलेबेल

यावेळी शाहंना ठाकरेंना पुन्हा सोबत घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देतांना शाह म्हणाले की, राज्यात आमची शिवसेनेशी युती आहे, आणि युतीत सर्वकाही आलबेल असल्याचे स्पष्ट केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळाले होते. मात्र, पवारांनी आमचे मित्र उद्धव ठाकरे यांना आमच्यापासून तोडले. आम्ही निवडणूक एकत्रपणे युतीत लढवली होती. त्यामुळे ज्यांनी हे सगळं सुरु केलं आहे त्यांनीच हे संपवलं पाहिजे.

मुंबईच्या सहा जागांचा गड महायुती राखणार की महाविकास आघाडी सुरुंग लावणार?

मोदींच्या निवृत्तीवरही केले भाष्य

मुलाखतीदरम्यान अमित शाहंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, मोदी आपली टर्म पूर्ण करतील. तसेच पुढेही मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील. याबाबत भाजपात कोणताही संभ्रम नसल्याचे शाह म्हणाले. विरोधक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही शाह म्हणाले.

भुजबळांचा मोठा खुलासा! म्हणाले, जरांगे पाटलांमुळे माझ्या उमेदवारीला आडकाठी

400 पार वर शाह ठाम 

देशात लोकसभेसाठी मतदानाचे सहा टप्पे पार झाले असून, शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप 400 पार करेल यावर ठाम असल्याचे सांगितले. मतदानाचा शेवटचा टप्पा गाठण्याआधीच भाजपनं बहुमताचा टप्पा गाठल्याचा दावा शाहंनी बोलताना केला. सहाव्या टप्प्यापर्यंत भाजपनं 300 ते 350 जागांच्या आसपास असल्याचे सांगितले. यात शेवटच्या टप्प्यातील जागांचा समावेश नाही. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर भाजप नक्कीच 400 पार गेलेले असेल असा विश्वास अमित शाहंनी बोलताना व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube