मोठी बातमी! बाबा सिद्दीकी खून प्रकरण, शूटर शिवकुमारला अटक

  • Written By: Published:
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी खून प्रकरण, शूटर शिवकुमारला अटक

Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या (Baba Siddiqui Murder Case) प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार उत्तर प्रदेश एसटीएफ आणि मुंबई गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील शूटर शिवकुमारला अटक केली आहे.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, शूटर शिवकुमारसह उत्तर प्रदेशातील अन्य तीन आरोपींनाही अटक करण्यात आली असून या आरोपींना मुंबईला आण्यात येत आहे. शूटर शिवकुमारला यूपी एसटीएफ आणि मुंबई क्राइम ब्रँचने संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. तो बहराइचच्या नानपारा येथे होता आणि नेपाळला पळून जाण्याची तयारी करत होता. अशी माहिती समोर येत आहे.

कोणाला अटक झाली?

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, शूटर शिवकुमार नेपाळला जाण्याची तयारी करत होता. पण यूपी एसटीएफ आणि मुंबई क्राइम ब्रँचने त्यापूर्वीच त्याला अटक केली. तर दुसरीकडे या प्रकरणात शिवकुमारसह अनुराग कश्यप, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेश यांनाही अटक करण्यात आली आहे.

Rahul Kalate : राहुल कलाटेंसाठी खासदार कोल्हेंची बाईक रॅली

पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 19 जणांना अटक केली आहे. शिवकुमारच्या आधी धर्मराज आणि गुरमेल यांनाही अटक करण्यात आली आहे. तर 6 नोव्हेंबर रोजी या प्रकरणी दोन आरोपींना पुण्यातून अटक केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर (शनिवारी) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी 12 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांच्या ऑफिस बाहेर असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube