विधानसभेपूर्वीच बाळासाहेब थोरांतावर मोठी जबाबदारी, कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी निवड

विधानसभेपूर्वीच बाळासाहेब थोरांतावर मोठी जबाबदारी, कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी निवड

Balasaheb Thorat : काँग्रेसच्या वर्किंग कमिटीममध्ये (Congress Working Committee) महाराष्ट्र कॉंग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरा (Balasaheb Thorat) यांचा समावेश करण्यात आला. त्यांची काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. ही वर्किंग कमिटी पक्षाचे महत्वपूर्ण निर्णय घेण्याचं काम करते.

विधानसभेपूर्वीच बाळासाहेब थोरांतावर मोठी जबाबदारी, कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी निवड 

कॉंग्रेसने एक ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसने बाळासाहेब थोरातांची वर्किंग कमेटीच्या सदस्यपदी निवड करत त्यांच्यावर विश्वास दाखवला. चर मोहम्मद आरिफ नसीम खान यांची CWC चे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सय्यद मुझफ्फर हुसेन यांची महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Letsupp Special : मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार मिळविण्यात कमी का पडतात? ठाकूर, मतकरी यांची रोखठोक मतं 

मधल्या काळात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने महाराष्ट्रात काँग्रेस बॅकफूटवर गेली होतीय. मात्र, थोरात काँग्रेसमध्येच राहिले होते. ते राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांना थोरांताची साथ असल्याचं मानलं जात होतं. त्यामुळं थोरातांना टीकेचा आणि चौकशीला सामोरं जावं लागलं. याचा मोठा फटका त्यांना बसला. त्यामुळेच तेव्हा थोरात यांना वर्किंग कमेटीत स्थान मिळालं नव्हतं. मात्र, आता कॉंग्रेसने त्यांची वर्किंग कमेटीच्या सदस्यपदी निवड

बाळासाहेब थोरात हे गेली 40 वर्षे संसदीय राजकारणात आहेत. 1985 ते आजतागायत संगमनेरचे नेतृत्व करत आहेत. ते आठव्यांदा संगमनेरमधून आमदार झाले आहेत. एवढं प्रदीर्घ काळ एका मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याचं रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. त्यांनी विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे या पाच मुख्यमंत्र्यांसोबत काम केले.

या पदांवर केलं काम
थोरात यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्ष प्रभारी म्हणूनही काम केलं. ते मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील छाननी समितीत होते. याशिवाय त्यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे स्थायी निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्तं करण्यात आलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube