HSC Exam : एकाच व्यक्तीने लिहिल्या 372 उत्तरपत्रिका; हस्ताक्षर घोटाळ्याने बोर्ड बुचकळ्यात
छत्रपती संभाजीनगर : बारावीच्या परीक्षेत झालेल्या अनोख्या कॉपीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बुचकळ्यात पडलं आहे. भौतिकशास्त्र विषयाच्या तब्बल 372 उत्तपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर आढळून आले आहे. बीड आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांमधील या उत्तर पत्रिका असल्याचही समोर आलं आहे. शिक्षण मंडळाने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालामधून हा प्रकार उघडकीस आला आहे. (Handwriting of a single person in 372 papers of Class XII Physics)
बारावीची पेपर तपासणी सुरु असताना यातील 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेमध्ये दोन वेगवेगळी हस्ताक्षर असल्याचं उघडकीस आलं. हा प्रकार संशयास्पद असल्याने याची माहिती शिक्षण मंडळाला देण्यात आली. त्यानंतर शिक्षण मंडळाने यासाठी एक चौकशी समिती गठित केली. या समितीने सर्व विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना नोटिसा पाठवत चौकशीसाठी बोलावले. तसंच विद्यार्थ्यांसोबतच केंद्रप्रमुख यांची देखील या प्रकरणी चौकशी करण्यात आली.
Gautami Patil: गौतमी पाटीलचा छोट्या पुढाऱ्याला उलटसवाल, म्हणाली…
यानंतर आता चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला आहे. यात 372 उत्तपत्रिकांमध्ये प्रथमदर्शनी अर्धवट राहिलेली उत्तरे एकाच व्यक्तीने लिहिली असल्याचं समोर आलं आहे. पण हे हस्ताक्षर नेमकं कोणाचं? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. मात्र चौकशी समितीने दिलेल्या अहवालामुळे एकच खळबळ उडालेली आहे.
Aaditya Thackeray : …तर मी आताचं राजीनामा देतो; आदित्य ठाकरेंचं CM शिंदेंना खुलं आव्हान
दरम्यान, विद्यार्थ्यांनी हे हस्ताक्षर आपलं नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका कोणत्या केंद्रावर घडला? ती व्यक्ती कोण? उत्तरपत्रिका जमा कधी केल्या? त्या कस्टडियनकडे कधी पाठवल्या? अशा अनेक प्रश्नांसह पर्यवेक्षक, कस्टडियन, मॉडरेटर हे सर्व जण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत. याशिवाय सेंटर मॅनेज झाले होते का? उत्तरपत्रिकाच बाहेर देण्यात आल्या होत्या का? हा प्रकार बीड आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांत कसा घडला? असेही अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत.