‘हे तर जनाब ठाकरे’; बजरंग बलीच्या टीकेनंतर बावनकुळेंनी सुनावले

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 04T160227.658

Chandrashekhar Bawankule Attack On Uddhav Thackeray  : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धवजी हुकूमशाही प्रवृत्तीचं कोण आहे ? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. याआधी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हुकूमशाही प्रवृत्तीचे म्हटले होते. या त्यांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत जोरदार उत्तर दिले आहे.

उद्धवजी हुकूमशाही प्रवृत्तीचं कोण आहे ? तुमच्या अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात महाराष्ट्रानं बघितलं आहे. तुमच्या विरोधात टीका केली म्हणून नारायण राणेजी यांना तुरुंगात टाकलं, त्याला हुकूमशाही म्हणतात. कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण करणं, याला हुकूमशाही म्हणतात. तुमच्या विरोधात बोललं म्हणून पत्रकाराला घरातून अटक करणं याला हुकूमशाही म्हणतात. विरोधात भूमिका घेतली म्हणून अभिनेत्रीचं घर तोडणं याला हुकूमशाही म्हणतात. त्यामुळे मोदीजींना हुकूमशाही प्रवृत्तीचं म्हणण्याआधी थोडा आपला सत्तेचा कार्यकाळ आठवा, अशा शब्दांमध्ये बावनकुळेंना ठाकरेंना सुनावले आहे.

अंतिम निर्णय बाकी, पण माझ्याकडून… शरद पवारांच्या राजीनाम्यावर ठाकरे बोलले

तसेच कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये सध्या बजरंग बलीचा मुद्दा देखील चर्चेला आहे. यावरुनही उद्धव ठाकरेंनी मोदींवर हिंदूत्वाच्या नावाने प्रचार केलाचा आरोप केला आहे. त्यावर देखील बावनकुळेंनी ठाकरेंना सुनावले आहे. राहिला प्रश्न ‘जय बजरंगबली‘ नारा देण्याचा तर आम्हाला ‘जय श्रीराम‘ आणि ‘जय बजरंगबली‘ जयघोष करण्याचा अभिमान आहे. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यापासून तुम्हाला मात्र हिंदुत्वाचा विसर पडला आहे, असे ते म्हणाले आहेत.

Sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार

तसेच रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सवाला तुम्ही साधं ट्विट करू शकला नाहीत. त्यामुळे तुम्हाला ‘जय बजरंग बली‘चा नारा दिल्यावर दुःख वाटणं साहजिकच आहे. कारण तुम्ही आता जनाब ठाकरेंच्या भूमिकेत आहात, असे म्हणत बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष केले आहे. दरम्यान, आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्याला आता बावनकुळेंनी जोरदार उत्तर दिले आहे.

Tags

follow us