राष्ट्रवादीने अजितदादा अन् भुजबळांवर अन्याय केला : चंद्रशेखर बावनकुळे

राष्ट्रवादीने अजितदादा अन् भुजबळांवर अन्याय केला : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar :  आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. आज अचानकपणे शरद पवारांनी हा निर्णय जाहीर केल्याने विविध स्तरातून आपल्या प्रतिक्रिया येत आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ आणि अजित पवार यांना संधी मिळाली असती तर राष्ट्रवादीला चांगले दिवस आले असते, असे बावनकुळे म्हणाले. पण ज्याप्रकारे प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांनी कार्यकारी अध्यक्ष केलं त्यावरुन सुप्रिया सुळे याच पुढे जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशी चिन्ह दिसत आहे. यांनी नागपूरमध्ये ओबीसींचा मेळावा घेतला. तिथे मोठ्या वल्गना केल्या. तेव्हा मला वाटले की छगन भुजबळ यांना राष्ट्रीय अध्यक्ष नेमतील आणि महाराष्ट्रातमध्ये थोडं काम करणारे अजित पवार यांना नेमतील, असा टोला बावनकुळेंनी लगावला.

कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे अन् प्रफुल्ल पटेल यांची निवड का? शरद पवारांनी सांगितलं कारण

पण ज्या प्रकारे या नियुक्ता केल्या आहे, त्यावरुन अजितदादांना यांना अध्यक्ष करायचंच नव्हतं. मागच्यावेळी तीन दिवस फक्त तमाशा केला. त्यामुळे छगन भुजबळ यांच्यासारखा ओबीसी नेतादेखील मागे पडला. ज्यापद्धतीने छगन भुजबळ यांनी नागपूर येथे भाषण दिले होते. त्यावरुन असे वाटत होते की छगन भुजबळ आणि अजित पवार यांना कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात येईल, असे बावनकुळे म्हणाले.

शकुनीमामाचं मिशन फत्ते! पवारांची भाकरी, सामनात पेढे; राणेंची राऊतांवर टीका

दरम्यान,  मागच्यावेळेस जे वगनाट्य झालं होतं ते घरगुती तमाशाचं वगनाट्य होतं. ते नाट्य संपलं आणि कार्यक्षम लोक बाजूला घालवले. भुजबळांसारखे ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं, अजितदादा ज्यांनी एवढं काम केलं त्यांना बाजूला सारलं. ज्यांना खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्र माहित नाही त्यांना संधी मिळाली. हा त्यांच्या पक्षातला निर्णय असून अजितदादा आणि छगन भुजबळ यांची निवड महाराष्ट्राकरिता बरी झाली असती, असे ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube