विधान परिषदेची उमेदवारी मिळण्यात फडणवीसांचा किती वाटा?, पंकजा मुंडेंनी दिलं जोरदार उत्तर

विधान परिषदेची उमेदवारी मिळण्यात फडणवीसांचा किती वाटा?, पंकजा मुंडेंनी दिलं जोरदार उत्तर

Pankaja Munde :  विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राष्ट्रीय नेत्यांचे आभार मानताना माध्यमांनी तुम्हाला उमेदावीर मिळण्यामध्ये (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीसांचा किती वाटा आहे असा प्रश्न विचारला असता, ते आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचाच मोठा वाटा आहे अशी प्रतिक्रिया (Pankaja Munde) पंकजा मुंडे यांनी दिली. त्या विधान परिषदेसाठी उमेदवारी  (Mlc Election)अर्ज भरण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होत्या. तसंच्, त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही आभार मानले.

सर्व प्रभारींचे आभार हिंदू हिंसक! संसदेत राहुल गांधींनी जाहीर माफी मागावी; देवेंद्र फडणवीसांनी बजावलं

मागील 5 वर्ष कुठल्या पदावर नसतानाही लोकांची सेवा कोली. आत्ता लोकसभा निवडणुकीत मला अत्यंत कमी मताने पराभव पत्करावा लागला. दरम्यान, पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आहे. पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकण्याचं ठरवलं आहे. पक्षाने मला संधी दिल्यानंतर मला पक्षासाठी काय योगदान देता येईल यासाठी मी काम करणार आहे, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मला संधी दिल्याबद्दल मी पक्षातील सर्व प्रभारी नेत्यांचंही आभार मानते असंही त्या म्हणाल्या.

अस करायला नको होतं भाजप नेत्यांनी स्वत:चे कान साफ करावेत; राहुल गांधींच्या हिंदू  वक्तव्यावर राऊतांची मोठी प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या. त्या घटनांचा उल्लेखही पंकजा मुंडे यांनी केला. आज जे मला मिळालंय ते मी माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतेय. आज ते कार्यकर्ते असते तर तेही या आनंदात सहभागी झाले असते. त्यांनी असं करायला नको होतं. आपल्याला अजून खूप काम करायचं आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मला दु;ख वाटणं नैसर्गिक आहे. कारण जनतेने मला खूप प्रेम दिलंय. पण कोणीही नेत्यासाठी जीव देऊ नये, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

तरीही बीड लोकसभेला त्यांचा पराभव

पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत ३० जागा मिळाल्या. तर महायुतीला फक्त १७ जागांवर समाधान मानावं लागलं. ज्या जागा पडल्या त्यातली एक जागा पंकजा मुंडे यांचीही होती. त्याआधी २०१९ मध्ये ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकीतही त्यांना संधी देण्यात आली होती. पण त्यांचा भाऊ धनंजय मुंडे यांनीच त्यांना हरवलं. यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आले. तरीही बीड लोकसभेला त्यांचा पराभव झाला. अखेर, पक्षाने त्यांनी विधानपरिषदेची संधी दिली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube