अजित पवारांच्या तीन टर्ममध्ये क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान, निवडणुकीतून माघार घ्या; भाजप नेत्याचे गंभीर आरोप

Ramdas Tadas Demand on Ajit Pawar आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीच्या रिंगणात सामना रंगणार आहे.

Ramdas Tadas Demand On Ajit Pawar

BJP Leader Ramdas Tadas Demand on Ajit Pawar Maharashtra Olympic Association elections : राज्यामध्ये सध्या एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू आहे. यामध्ये आता महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणूक देखील चर्चेत आली आहे. कारण यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या निवडणुकीमध्ये उतरले आहेत. दुसरीकडे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि माजी कुस्तीपटू अशी ओळख असणारे मुरलीधर मोहोळ देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र यावरून भाजप नेत्याने मात्र अजित पवारांनी निवडणुकीतून माघार घेण्याची मागणी केली आहे.

अजित पवारांनी निवडणुकीतून माघार घ्यावी…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि माजी कुस्तीपटूअशी ओळख असणारे मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीच्या रिंगणात सामना रंगणार आहे. यावर बोलताना भाजपचे नेतेआणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अजित पवारांवर टीका करत त्यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी अशी मागणी केली आहे.

आदिनाथ कोठारेचं खास सरप्राईज! लवकरच ‘या’ वेबसीरिजसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार, दुहेरी भूमिका साकारणार…

यावेळी बोलताना तडस म्हणाले की, अजितदादा, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीतून माघार घ्या क्रीडा संघटनांवर माजी खेळाडूंनाच राहू द्या, तिथे राजकारण आणू नका. अजित पवारांच्या मागील तीन टर्ममध्ये महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या समितीने ऑलिम्पिक संघटनेच्या खर्चा हिशोब दिला नाही. असा आरोप तडस यांनी केला. तसेच माजी कुस्तीपटू अशी ओळख असणारे मुरलीधर मोहोळांना ही संधी मिळाल्यास ते क्रीडा क्षेत्राला पुढे नेतील असंही तडस म्हणाले.

IND vs WI : वेस्ट इंडिजचा क्लीन स्वीप, गंभीरला वाढदिवसाची भेट, इंडियाने दिल्ली कसोटी मालिका जिंकली

दरम्यान अजित पवारांनी तीन वेळा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. त्यांची यावर मजबूत पकड आहे. दुसरीकडे थेट केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि माजी कुस्तीपटू अशी ओळख असणारे मुरलीधर मोहोळ देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

follow us