महायुतीतून अजितदादांचं ‘घड्याळ’ वगळलं तरीही मजबुती कायम; वाचा कशी आहे ‘आकडेमोड’!

  • Written By: Published:
महायुतीतून अजितदादांचं ‘घड्याळ’ वगळलं तरीही मजबुती कायम; वाचा कशी आहे ‘आकडेमोड’!

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महायुतीचा करिष्मा चाललाच नाही. त्यातही एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेने अजितदादांच्या राष्ट्रवादीपेक्षा चांगली कामगिरी केली. त्यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप अजितदादांना (Ajit Pawar) बाजूला करत केवळ शिंदेंनाच सोबत ठेवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या सर्व चर्चांमध्ये खरचं महायुतीतून अजितदादांची राष्ट्रवादी बाहेर पडली तर, महायुती मजबूत राहिलं का? नेमकी गणितं काय? हेच आपण जाणून घेऊया. (Ajit Pawar NCP May Be Remove From Mahayuti Alliance )

Father’s Day : ठाकरे, पवार अन् फडणवीस, राजकारण गाजवणारी ‘बाप’ माणसं

लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 पारचा नारा देणाऱ्या महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या. यातही 28 जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त नऊच जागा जिंकता आल्या. तब्बल 19 उमेदवार पराभूत झाले. या धक्क्यातून सावरत भाजपने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विधानसभेच्या 164 हून अधिक मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. तर महायुती केवळ 128 विधानसभा मतदारसंघात पुढे आहे. आता विधानसभेच्या 288 जागांपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी किमान 80 जागांची मागणी करण्याच्या तयारीत आहे. यात बार्गेनिंग होऊन त्यांना किमान प्रत्येकी 70 जागा दिल्या तरी भाजपच्या वाट्याला केवळ 148 जागा येतात.

छगन भुजबळ नाराज नाहीत, महायुतीही अभेद्य; नाराजीच्या चर्चांना अजितदादांचा फुलस्टॉप!

विधानसभेसाठी बहुमताचा आकडा 145

आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 288 जागा आहेत. राज्यात सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला 145 हा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक आहे. सध्या राज्यात अस्तिवात असलेल्या महायुतीचं एकूण संख्याबळ 203 इतके आहे. मात्र, लोकसभेतील राष्ट्रवादीच्या परफॉर्मन्सनंतर भाजप महायुतीतून अजित पवारांना बाजूला करू शकते. त्यामुळे महायुती धोक्यात येईल असा प्रश्न आहे.

अजितदादांना वजा करूनही तोटा नाही

समजा, अजित पवारांना महायुतीतून वजा केले तर, याचा परिणाम महायुतीवर होऊ शकतो का? असं वाटतं असेल तर, हा अंदाज पूर्णतः चुकीचा आहे. कारण सध्या विधानसभेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमिळून महायुतीचं एकूण संख्याबळ 203 इतके आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर जरी महायुतीतून राष्ट्रवादीचे 40 आमदार वगळले तरीदेखील संख्याबळ 163 इतके राहत आहे जे बहुमताच्या आकडेवारीपेक्षा 18 ने अधिक आहे. त्याशिवाय अपक्ष आमदार साथीला आहेत. त्यामुळे जरी महायुतीतून राष्ट्रवादीला बाहेर काढलं तरीदेखील सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेली बळकटी कायम असल्याचे चित्र आहे.

भुजबळांच्या आनंदावर संशोधन करा अन् त्यांना काय हवयं ते एकदाचं देऊन टाका; शिरसाटांनी कान टोचले

अजितदादांसोबत महयुतीचं गणित किती बळकट?

सध्याचा विधानसभेतील आकडेवारीचा विचार केला तर, अजितदादांच्या राष्ट्रवादीसह एकूण संख्याबळ 203 इतके आहे. यात भाजपचे 103. राष्ट्रवादीचे 40, शिवसेनेचे 38, बहुजन विकास आघाडीचे 3, प्रहार जनशक्तीचे 2, राष्ट्रीय समाज पक्षाचा 1, जेएसएसचा 1 , मनसेचा 1 आणि अपक्ष 14 अशी ताकद आहे.

आमदार अन् नेते सोडून जाण्याच्या भीतीने सुनेत्रा पवारांना खासदारकी; रोहित पवारांचा दावा

अजितदादांना वजा केलं तरीही आकडेवारी मॅजिक फिगरच्या वर

आता प्रश्न महायुतीतून अजितदादांच्या 40 आमदारांना वगळलं तरीही विधानसभेतील बहुमताला कोणताही धोका निर्माण होत नाही. बहुमताच्या 145 आकडेवारीच्या वर म्हणजेच 18 एवढी संख्या सत्ताधाऱ्यांकडे राहिल. यात भाजपचे 103, शिवसेनेचे 38, बहुजन विकास आघाडीचे 3, प्रहार जनशक्तीचे 2, राष्ट्रीय समाज पक्षाचा 1, जेएसएसचा 1 , मनसेचा 1 आणि अपक्ष 14 एवढी ताकद पाठीशी कायम राहत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर 150 हून अधिक जागा लढवण्याचा विचार करत असलेला भाजप अजित पवारांना महायुतीतून बाजूला ठेवण्याचा विचार करू शकते असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज