मुलाला कॉपी पुरविणारा तहसीलदार अखेर अडकला, संपूर्ण परीक्षेत मुलाला कॉपी पुरवली, अखेर गुन्हा दाखल

मुलाला कॉपी पुरविणारा तहसीलदार अखेर अडकला, संपूर्ण परीक्षेत मुलाला कॉपी पुरवली, अखेर गुन्हा दाखल

case registered on Tehsildar provided copies to child : बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर तहसीलदाराला कॉपी पुरवताना रंगेहाथ पकडण्यात आले. अनिल तोरडमल (Anil Toradmal) असं या नायब तहसीलदाराचे नाव आहे अखेर या तहसिलदारावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Santosh Deshmukh Case : बीड हत्येप्रकरणी पंधराशे पानांचं आरोपपत्र दाखल, चार्जशीटमध्ये नेमकं काय?

या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, शिवाजी अंबादास दळे या केंद्र संचालकांनी हा गुन्हा दाखल केला. ते म्हणाले की, आज दि.27.02.2025 रोजी सकाळी 11.00 वा.पा. ते 14.10 वा.पावेतो जिवशास्त्र विषयाची परीक्षा असल्याने आम्ही सकाळी 10.30 वा. विद्यार्थ्यांना परिक्षा हाँलमध्ये बसवले. विदयार्थ्यांना उत्तर पत्रिका व प्रश्न पत्रिकांचे नियोजीत वेळेत वाटप करुन 11.00 वा. पेपरला सुरुवात झाली होती. मी तसेच माझ्या सोबत उपकेंद्र
संचालक शिवाजी अंबादास खेडकर असे आम्ही पेपर सुरु झाल्यानंतर सर्व वर्गातील वेब कास्टींग लिंकसाठी सर्व परिक्षा हॉलवरील पर्यवेक्षक जॉइन झाले की, नाही हे तपासत असतांना होतो.

छावाने सादर केली कणा! मराठी राजभाषा दिनानिमित्त विकी कौशलने वाचली कविता

तेव्हा 14 नंबर ब्लॉकच्या बाजुला असलेल्या संस्था ऑफीसचे समोर मला बोलवुन सांगितले की, समोर बसलेला व्यक्ती त्याने गळ्यात लाल व पाढऱ्या रंगाची आयडी कार्डची लेस त्यावर महाराष्ट्र शासन महसुल विभाग असे लिहलेले आयडी कार्ड परिधान केलेली व्यक्ती कोण आहे? त्याच्यावर संशय वाटत आहे. म्हणुन मी व उपकेंद्र संचालक शिवाजी अंबादास खेडकर आम्ही चौकशी केली असता त्याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु सखोल चौकशी केली असता त्यांनी त्याचे नाव अनिल फक्कडराव तोरडमल नायब तहसिलदार नेम. जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर असे सांगुन त्यांनी त्यांचा मुलगा 12 वी परिक्षेला सदर परिक्षा केंद्रावर असल्याचे सांगितले व मी माझ्या मुलासाठी इथे आलो असल्याचे सांगितले.

कितीही डुबक्या मारा, गद्दारीचा शिक्का पुसल्या जाणार नाही, उद्धव ठाकरेंचा DCM शिंदेंवर हल्लाबोल

मला व उपकेंद्र संचालक शिवाजी खेडकर यांना 12 वी परिक्षेचे पहिल्या दिवशी देखील आम्ही त्याची विचारपुस केली असता त्याने आम्हाला, मी नायब तहसिलदार असुन जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथुन आलेलो आहे. असे सांगुन त्यांनी परिधान केलेले आयकार्ड काढुन आम्हाला दाखविले होते. शासनाचे कॉपीमुक्त परिक्षा धोरणाचे अनुशंगाने जिल्हास्तरावरील व तालुका स्तरावरील नेमलेले वेगवेगळे बैठे व भरारी पथक परिक्षा कालावधीमध्ये परिक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी येत असतात सदर व्यक्ती देखील एखाद्या पथकातील असेल असे मला वाटल्याने मी परिक्षा सुरळीत पार पाडण्याचे कामामध्ये व्यस्त झालो.

एम डी फाउंडेशनकडून वृक्ष लागवड आणि रक्तदान शिबिर; 30 वर्षांपासूनची परंपरा कायम

कामाचे ओघात मी पुन्हा त्यांचेकडे लक्ष दिले नाही.आज रोजी मी घडलेल्या घटने बाबत वरिष्ठांशी चर्चा करुन परिक्षा संपल्यानंतर नमुद व्यक्ती विरुद्ध फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशन येथे आलो आहे. तरी दि.11.02.2025 व दि.27.02.025 रोजी इयत्ता 12 वी चे परिक्षा कालावधीत इसम नामे अनिल फक्कडराव तोरडमल नायब तहसिलदार अहिल्यानगर याने संत भगवान बाबा उच्च माध्यमिक विद्यालय तनपुरवाडी केंद्र क्र. 0258 येथे त्याच्या मुलास काँपी पुरवण्याचे उद्देशाने अनाधिकृतरित्या प्रवेश मिळवून, त्यास कोणत्याही प्रकारचे शासकीय कर्तव्य नेमलेले नसतांना परिक्षा केंद्रावर थांबुन मा. जिल्हाधिकारी सो यांचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन माझी नमुद इसमा विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 223 व महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग अधिनियम क्र. 31 सन 1982 महाराष्ट्र विद्यापिठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षेमध्ये होणारा गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम 1982 मधील कलम 7 प्रमाणे फिर्याद आहे.

परीक्षा केंद्रावर नेमक काय घडलं ?

राज्यात सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. पाथर्डीमध्ये कॉपी प्रकार सर्वाधिक घडतात असा इतिहास आहे. यातच या तालुक्यात सुरू असलेल्या एका परीक्षा केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला. नायब तहसीलदार हे मुलाला मदत म्हणून परीक्षा केंद्रावर पोहोचले. पेपर सुरु झाल्यानंतर त्यांनी मुलाला कॉपी देण्याचा प्रयत्न केला. परंतु, याचवेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तहसीलदार स्वत:च्याच मुलाला कॉपी पुरवत असल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

तर संबंधित शाळेची मान्यता रद्द होणार

कॉपी मुक्त परीक्षेसाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना जारी केल्या आहेत. सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश दिले आहेत. पण, आता आपल्या पाल्याला कॉपी पुरवतांना पकडल्या गेलेल्या नायब तहसीलदारावर गुन्हा दाखल झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube