वाल्मिक कराडने चांगलं काम केलं असेल म्हणून त्याला…भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असं का म्हणाले?
Chandrashekhar Bawankule on Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलेलं आहे. या हत्येचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, (Bawankule ) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मिक कराड परळीमध्ये लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष असल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा? अजितदादांनी मौन सोडलं; म्हणाले, माझ्या कामाची..,
हे प्रकरण आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलंच उचलून धरलं आहे. एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष कसं केलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सुळेंच्या याच प्रश्नाला भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले बावनकुळे?
परळीत लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष वाल्मिक कराड आहे, यावर विरोधकांकडून टीका करत आहेत, याबाबत विचारले असता ते म्हणाले, वाल्मिक कराडने चांगलं काम केलं असेल म्हणून त्याला लाडकी बहीण योजनेचंअध्यक्ष पद दिलं असेल. परंतु, जर चुकीचं काम केलं असेल तर शिक्षाही होईल, असं त्यांनी यावेळी सांगितले. तसंच, बीडमधील हत्या प्रकरणात प्रकरणात सरकारने पुढाकार घेतला आहे. हे सरकार कारवाई करत आहे. अनेक जणांच्या चौकशीही लावल्या आहेत. या प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस हे स्वतः लक्ष घालून आहेत. शेवटपर्यंत लक्ष देतील आणि आरोपींना शिक्षा भेटेल.
भेगडे यांच्यावर कारवाई
यावेळी त्यांनी मावळ विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके विरोधात प्रचार करणारे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यावर आमची शिस्तभंग समिती योग्य निर्णय घेईल, असंही सांगितलं. त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुनील शेळके यांचं काम केल्याचंही बावनकुळे म्हणाले.