असा मुख्यमंत्री पाहिलाय का? CM शिंदेंचा फडणवीसांशी पुन्हा पंगा

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 06 16T163638.050

Eknath Shinde and Devendra Fadanvis :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुण्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या जाहिरातीमुळे भाजप  शिसेना यांच्यात वाद सुरु होता. त्या जाहिरातीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर फडणवीसांनी शिंदेंबरोबरचे आपले कार्यक्रम रद्द केले होते. पण काल हे दोन्ही नेते एका कार्यक्रमात एकत्र दिसले आणि दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळली. यानंतर आज पुन्हा शिंदेंनी फडणवीसांशी पंगा घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. याचे कारण शिंदेंनी केलेले विधान होय.

शिंदे म्हणाले, कोणता मुख्यमंत्री मुंबईच्या रस्त्यावर फिरलाय, मुंबईच्या नालेसफाईची माहिती करायला  फिरलाय, कोणता मुख्यमंत्री प्रकल्प पहायला फिरलाय, समृद्धीला गेलाय, पुण्याला आलाय, असे प्रश्न शिंदेंनी पत्रकारांना विचारले. तसेच तुम्ही या गोष्टी छापत नाही,  तुम्ही दुजाभाव करता, असे शिंदे  म्हणाले. यामुळे शिंदेंनी पुन्हा एकदा फडणवीसांना डिवचले आहे का, असे बोलले जात आहे.

Gulabrao Patil : विकेट जाण्याची चर्चा अन् पवारांसोबत प्रवास… राजधानी एक्सप्रेस मंत्रिपद वाचविणार?

तसेच त्यांनी शिवसेना भाजप युतीवरदेखील भाष्य केले.   ही युती वेगळ्या वैचारिक भावनेतून आम्ही केली आहे. वर्षभरापूर्वी आम्ही जो मिठाचा खडा टाकला होता तो आम्ही फेकून दिला. जाहिरातीमुळे आमच्यात वितुष्ट येणार नाही. एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे ही युती तुटणार नाही. आमची सत्तेसाठी, पदासाठी, खुर्चीसाठी युती झालेली नाही. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत, असे ते म्हणाले.

आक्रमक भाजप नेत्यांची ‘तलवार’ अचानक म्यान; फडणवीस-बावनकुळेंची कार्यकर्त्यांना तंबी

तसेच आधीच सरकार घरी होतं आमच्या सरकार लोकांच्या दारी जातय, असे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणी डॉ. हेडगेवार यांचा धडा वगळल्याने शिंदेंनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  सावरकर, हेडगेवार ही मोठी व्यक्तीमत्व आहे. सावरकरांनी तर देश स्वातंत्र्य होण्यासाठी जो प्रयत्न केलाय तो कुणालाही नाकारता येणार नाही. शालेय अभ्यासक्रमातून धडा वगळण्याचा निर्णय दुर्भाग्यपूर्ण असून याचा मी निषेध करतो, असे शिंदे म्हणाले.

 

 

Tags

follow us