नाना पटोलेंनी एकाचवेळी अजित पवार अन् झिरवळांना घेतलं पट्ट्यात; म्हणाले, तुम्ही…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 12T165654.500

Nana Patole On Ajit Pawar :  राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. या निर्णयावरुन राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे बोट दाखवले होते. त्यावर आता नाना पटोलेंनी त्यांना उत्तर दिले आहे.

त्यांनी आपली स्वत:ची चूक मान्य केली की आम्ही काँग्रेसचा दुसरा अध्यक्ष होऊ दिला नाही.  त्यांनी ती चूक मान्य केली. आता सुप्रीम कोर्टाने आपली सगळी भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टापेक्षा तर अजितदादा मोठे नाही आहे, अशा शब्दात पटोलेंनी अजितदादांना सुनावले आहे. तसेच आता त्यांचा उपाध्यक्ष बोलायला लागलेला आहे. आतापर्यंत बोलत नव्हते. मी जे अधिकार वापरु शकत होते ते अधिकार ते देखील वापरु शकत होते, असे म्हणत नाना पटोलेंनी नरहरी झिरवाळांनादेखील सुनावले आहे.

Jayant Patil ED Notice : जयंत पाटलांनी हजर राहण्यासाठी मागितली मुदत…

यांंच्या उपध्यक्षांनी 16 आमदारांना अपात्र का केले नाही.  जेव्हा त्यांच्या उपाध्यक्षांना अधिकार होते तेव्हा त्यांनी का वापरले नाही, याचे उत्तर ते का देत नाही. त्यामुळे नाचता येईन अंगण वाकडे अशी मराठीत म्हण आहे. यामुळे यात मला फार जायचे नाही. आम्ही मागच्यावेळेस देखील पडता टाकायचा प्रयत्न केला, अशा शब्दात नाना पटोलेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

CAT ने निलंबन रद्द केलंय, परमबीर सिंग यांच्या निलंबनावर फडणवीस म्हणाले…

काय म्हणाले होते अजित पवार

नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना नविचारता दिला. तो राजीनामा त्यांनी द्यायला नको होता. तसेच त्यावेळीच अध्यक्षांची नेमणूक लवकर करायला हवी होती. अनेक काळ उपाध्यक्ष काम पाहत होते. जर ती पोस्ट भरली गेली असती तर या 16 आमदारांना त्यांनीच अपात्र केला असतं. असं म्हणत अजित पवारांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे या आमदार अपात्रतेवरून बोट दाखलवलं आहे.

Tags

follow us