Odisha Accident : ओडिसात रक्तदानासाठी झुंबड तर, महाराष्ट्रात शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय
Coromandel Train Accident : ओडिसात तीव रेल्वेंच्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 250 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातानंतर मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील अपघातस्थळाला तसेच रूग्णालयांमध्ये जात जखमींची विचारपूस करणार आहेत. या भीषण अपघातानंतर ओडिसातील अनेक रूग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लाखो नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. तर, महाराष्ट्रानेदेखील या भीषण परिस्थीतीत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
ओडिशातील रेल्वे अपघाताने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 250 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे तर 900 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या जखमींचा जीव वाचवण्यासाठी ओडिशावासियांनी रक्ताची गरज लक्षात घेत मोठ्या संख्येने रक्तदानासाठी रूग्णांलयांबाहेर रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे यासाठी त्यांना नाही सरकारने आवाहन केलेले नाही.
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
एकीकडे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबाबत देशभरातून हळहळ व्यक्त केली जात असताना महाराष्ट्र सरकारनेदेखील मोठा निर्णय घेत माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. या भीषष घटनेनंतर देशपातळीवरील अनेक सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, महाराष्ट्रात एसटी महामंडळानेही त्यांचा आज साजरा होणारा अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाचे सर्व कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिशातील दुर्दैवी घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी आज एसटी महामंडळाचे अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम स्थगित केल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.
कोरोमंडल एक्सप्रेस अपघातामुळे 18 गाड्या रद्द
-12837 हावडा-पुरी एक्सप्रेस (2 जून 2023)
-12863 हावडा-सर एम विश्वेवैय्या टर्मिनल एक्सप्रेस (2 जून 2023)
-12839 हावडा-चेन्नई मेल (2 जून 2023)
-12895 शालीमार-पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस (2 जून 2023)
-20831 शालीमार-संबळपूर एक्सप्रेस (2 जून 2023)
-02837 संत्रागाछी-पुरी विशेष (2 जून 2023)
-222021 सियालदह-पुरी दुरांतो एक्सप्रेस (2 जून 2023)
-12074 भुवनेश्वर-हावडा जन शताब्दी एक्सप्रेस (भुवनेश्वर येथून 03.06.2023 रोजी)
-12278 पुरी-हावडा शताब्दी एक्सप्रेस (पुरीहून 03.06.2023 रोजी)
-12277 हावडा-पुरी शताब्दी एक्सप्रेस (03.06.2023 रोजी हावडाहून)
-12822 पुरी-शालीमार धौली एक्सप्रेस (पुरीहून 03.06.2023 रोजी)
-12821 शालीमार-पुरी धौली एक्सप्रेस (शालिमार येथून ०३.०६.२०२३)
-12892 पुरी-बंगरीपोसी एक्सप्रेस (पुरीहून 03.06.2023 रोजी)
-12891 बांगरीपोसी-पुरी एक्सप्रेस (बंगरीपोसी येथून 03.06.2023 रोजी)
-02838 पुरी-संत्रागाछी स्पेशल ट्रेन (पुरीहून 03.06.2023 रोजी)
-12842 चेन्नई-शालिमार कोरोमंडल एक्सप्रेस (चेन्नई येथून 03.06.2023)
-12509 SMVT बेंगळुरू-गुवाहाटी (02.06.2023 रोजी बेंगळुरूहून)
अनेक गाड्यांचे मार्ग बदलले
-22807 संत्रागाछी-चेन्नई एक्सप्रेस (02.06.2023)
-22873 दिघा-विशाखापट्टणम एक्सप्रेस (02.06.2023)
-18409 शालीमार-पुरी श्री जगन्नाथ एक्सप्रेस (02.06.2023)
-22817 हावडा-म्हैसूर एक्सप्रेस (02.06.2023)
-12802 नवी दिल्ली-पुरी पुरुषोत्तम एक्सप्रेस (01.06.2023 रोजी सुरू झालेली ही ट्रेन टाटा-केंदुझारगड मार्गे धावेल)
– 18478 ऋषिकेश-पुरी कलिंग उत्कल एक्सप्रेस (1 जून रोजी सुरू झालेली ही ट्रेन टाटा-केंदुझारगड मार्गे धावेल)
-12815 पुरी-आनंद विहार नंदनकानन एक्स्प्रेस (3 जून रोजी जाखापुरा-जरोली मार्गे धावेल)
– 08415 जलेश्वर-पुरी स्पेशल (3 जूनला जलेश्वरहून निघालेली ही ट्रेन जलेश्वरऐवजी भद्रकहून निघेल)
Video : आडनावाचा विषय : गौतमीसाठी सारा गाव एकवटला!