बीड जिल्ह्यातील चिंचाळ्याच्या बस वाहकाची आत्महत्या; परिवहन महामंडळाने केलं होतं निलंबित

Conductor Datta Ambalkar Commits Suicide : बीड जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या माजलगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले चिंचाळा येथील दत्ता अंबलकर नामक वाहकाने 26 जानेवारीच्या ( Datta Ambalkar ) मध्यरात्री शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दत्ता आंबळकर हे गेल्या दहा वर्षापासून परिवहन महामंडळाच्या माजलगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत होते.
काही दिवसात वाल्मीक कराड राजकारणात येतील अन् भाजपच्या गटात राऊतांचं खबळजनक विधान
गेल्या महिन्यापूर्वी एका प्रवाशाने तिकीट न घेता प्रवास केल्याच्या कारणावरू अबळकर यांना निलंबित करण्यात आलं होतं. यामुळे वाहक अंबलकर हे तणावात होते यानंतर ते 12 जानेवारीपासून कोणालाही न सांगता घरून निघून गेले होते. अंबलकर यांच्या वडिलांनी माजलगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली होती. 26 जानेवारी च्या मध्यरात्री अंबलकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दत्ता अंबलकर यांचे वडील सकाळी शेतात गेल्यावर उघडकीस आली.
वडवणी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी कुप्पा येथील आरोग्य केंद्रात पाठवलं. येथे शवविच्छेदन केल्यानंतर काही काळ नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. यामुळे दवाखान्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होतं. यानंतर माजलगाव बस स्थानकाचे आगार प्रमुख कोळपकर यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन आंबलकर यांच्या नातेवाईकांची समजूत काढून कुटुंबातील एका व्यक्तीला महामंडळात नोकरीला घेता येईल असं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेतलं.