ही तर…; पाटण्यातील मेहबुबा मुफ्ती ठाकरेंच्या ‘हम साथ साथ है’ वर फडणवीसांचा वार
Devendra Fadanvis Attack On Uddhav Thackeray : आगामी लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी एकत्र मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (दि. 23) पाटण्यात सर्वच विरोधी पक्षांची एकत्रित बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी राज्यातून उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध पक्षांने ज्येष्ठ नेते उपस्थित असून, विरोधकांच्या या बैठकीवर आणि ठाकरे मेहबुबा मुफ्तींच्या शेजारी बसण्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Missing Submarine : ‘फादर्स डे’ ची भेट बापलेकांना पडली महागात; टायटॅनिक पाहायला जायचं नव्हतं पण…
फडणवीस म्हणाले की, पाटण्यातील विरोधकांची आजची बैठक मोदी हटावसाठी नसून परिवार बचाव बैठक आहे. सर्व परिवारवादी पक्ष एकत्र आल्या असून, या बैठकीचा मुख्य उद्देश आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याकडे कशी सत्ता राहू शकेल हाच या बैठकीमागचा मुख्य उद्देश आहे. एकत्रित आलेल्या सर्व पक्षांसाठी सत्तेत आल्यानंतर राज्य चालवणे म्हणजे धंदा असल्याचा थेट आरोपही फडणवीसांनी केला. तर, भाजपसाठी मोदींसाठी ही सेवा आहे. 2019 च्या निवडणुकांदरम्यानही ही सर्व मंडळी एकत्र आली होती. पण जनाता ही मोदीजींच्याच पाठिशी असून, 2019 पेक्षाही मोदी आणि एनडीएच्या पाठीशी उभी राहिल असा विश्वास यावेळी फडणवीसांनी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे विरोधकांनी अशाप्रकारे किती मेळावे घेतले तरी त्याचा काही परिणाम होईल.
Video : PM मोदींच्या भाषणावेळी 15 वेळा उभे राहिले खासदार, 79 वेळा झाला टाळ्यांचा कडकडाट
मेहबुबा मुफ्तीच्या शेजारी बसण्यावरून हल्लाबोल
यावेळी फडणवीसांनी बैठकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी शेजारी बसण्यावरून जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मला आश्चर्य वाटतं की, सातत्याने मेहबुबा मुफ्ती यांच्या नावावर भाजपला नेमही टोमणे मारणारे उद्धव ठाकरे मुफ्ती यांच्यासोबत तर चाललेच आहे, पण आता तर ते थेट त्यांच्या बाजूलाच बसले आहेत. हा केविलवाणा प्रयत्न केवळ परिवारवादी पक्ष वाचण्यासाठी चालू असून यासाठी ही केलेली एकप्रकारची तडजोड असून, याचा कुठलाही परिणाम होईल असे वाटत नाही.
विरोधकांच्या बैठकीआधीच राहुल गांधींचा एल्गार
पाटण्यात विरोधकांच्या एकता बैठकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, ‘आम्ही मिळून भाजपचा पराभव करणार आहोत.’ कर्नाटकात आम्ही भाजपचा पराभव केला आहे. तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल, असा दावा त्यांनी केला. देशात दोन विचारधारांची लढाई सुरू आहे, एकीकडे आमची भारत जोडो आणि दुसरीकडे भाजपची भारत तोड़ो विचारधारा आहे. भाजप भारत तोडण्याचे काम करत आहे.
द्वेष आणि हिंसाचार पसरवण्याचे काम करत आहे आणि काँग्रेस पक्ष एकत्र येऊन प्रेम पसरवण्याचे काम करत आहे. द्वेष द्वेषाने तोडता येत नाही, द्वेष केवळ प्रेमानेच कापला जाऊ शकतो. बैठकीला जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी पाटणा येथील काँग्रेस कार्यालयाला भेट दिली. येथील कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, नरेंद्र मोदी आणि भाजपचा अर्थ केवळ २-३ लोकांना फायदा मिळवून देणे हा आहे, तर काँग्रेसचा अर्थ देशातील गरिबांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यासाठी काम करणे हा आहे.
ये ‘परिवार बचाओ’ गठबंधन है ❗
सभी लोग अपने परिवार बचाने एकत्रित हुए है।
अब उद्धवजी को महबूबा मुफ़्ती की बगल वाली कुर्सी पर बैठना चलता है ❓ pic.twitter.com/x6epL6R3vp— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 23, 2023
बैठकीत कोण-कोणते नेते ?
विरोधीपक्षांकडून आलेल्या या बैठकीासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुढाकार घेतला असून, आजच्या पाटण्यातील बैठकीसाठी देशातील विरोधीपक्षाचे बडे नेते उपस्थित आहेत. यात प्रामुख्याने कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीता राम येचुरी, उद्धव ठाकरे, मेहबुबा मुफ्ती, दीपांकर भट्टाचार्च आदी नेते उपस्थित आहेत.
https://www.youtube.com/watch?v=A4ldrRVej5k