न्यायाला विलंब होऊ नये यासाठी कटिबद्ध; मुंडेंच्या पोस्टनंतर अजितदादांच्या पक्षानं जारी केलं निवेदन

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर आज (दि.4) धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. पण या राजीनाम्यानंतर त्यांनी एक्स सोशल मीडिया अकाउंटवर ट्विट करत मोठं वक्तव्य केले होते. त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले असून, त्यानंतर आता अजित पवारांच्या पक्षाकडून एक निवेदन जारी करत यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Ajit Pawar Party Clarification On Dhananjay Munde X Post )
श्री. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावरती दिलेल्या राजीनामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे यांनी जारी केलेले पत्रक @SunilTatkare pic.twitter.com/ZxgvO2qnLe
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) March 4, 2025
निवेदन नेमकं काय?
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी हे पत्रक जारी करत असल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रारंभापासूनच अशी स्पष्ट भूमिका राहिली आहे की संतोष देशमुख हत्याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. बीडसह संपूर्ण राज्यभरातील आमच्या पक्षाच्या नेत्यांनी याबाबत अत्यंत ठाम भूमिका घेतल्याचाही यात उल्लेख करण्यात आला आहे.
राजीनामा देतानाही धनंजय मुंडेंनी मग्रुरी दाखवली : मनोज जरांगेंचा घणाघात
राजीनाम्याचा निर्णयनैतिकतेला धरून
आज धनंजय मुंडे यांनी घेतलेला राजीनाम्याच्या निर्णय हा नैतिकतेला धरून असल्याचेही म्हटले आहे. संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आमची अपेक्षा आहे. हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही. आजच्या घटनेतून हाच संदेश राज्याला गेला आहे.
अंजली दमानियांचा पुढचा प्लॅन ठरला; धनंजय मुंडेंचं मंत्रिपद घालवलं आता आमदारकीही घालवणार…
मुंडेंचा संबंध असल्याचे समोर आलेले नाही
धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाशी संबंध आहे असे तपासात समोर आलेले नाही. मात्र नैतिकतेच्या मुद्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांनी पूर्वीच नैतिक मुद्द्यांवर स्वतः राजीनामा देण्याचे उदाहरण निर्माण केले होते आणि या प्रकरणातही त्यांनी तशीच ठाम भूमिका घेतली होती. या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्त्वाचा संदेश देत आहे न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या कामात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही. न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. न्यायालयीने चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच,…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 4, 2025