देशमुख हत्या प्रकरणातील घुले, सांगळे अन् आंधळेला मदत डॉक्टर अटक; कोण आहेत संभाजी वायभसे?
DR. Sambhaji Waybhase : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी दोघांना (Santosh Deshmukh) अटक करण्यात सीआयडीला यश आले. देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड शरण आल्यानंतर तपासाला वेग आला आहे. यात हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तीन आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याचा संशय असलेल्या डॉ. संभाजी वायभसेला आणि त्याच्या पत्नालाही अटक करण्यात आली आहे.
कोण आहे संभाजी वायभसे?
संभाजी वायभसे हा स्वतःचा हॉस्पिटल बीड शहरांमध्ये काही वर्षांपूर्वी चालवायचा. मात्र तो नंतर ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे यांच्यासोबत तो काम करायचा अशी माहिती आहे, ऊसतोड मुकादम असे काम करत असताना त्या तिघांसोबत डॉक्टरचा संबंध आला. संभाजी वायभसे सध्या डॉक्टरकीचा व्यवसाय करत नाही. त्याची पत्नी वकील आहे. त्यांनी काही दिवस सरकारी वकील म्हणूनही काम केलेलं आहे. ते संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवसापासून संभाजी वायभसे फरार असल्याची माहिती होती. पहिल्या दिवसापासून पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. मात्र, तो सापडत नव्हता.
मोठी बातमी! बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेंसह तिघांना 14 दिवसांची सीआयडी कोठडी
सुदर्शन घुले सह संभाजी वायभसे देखील राज्याबाहेर गेले असल्याची माहिती होती, त्याने राज्य बाहेर जाऊन सुदर्शन घुले याला मदत केली होती. संभाजी वायभसेपर्यंत पोलीस पोहोचले, तेव्हा या दोघांची माहिती मिळाली अशी माहिती आहे. या प्रकरणाच्या कुटुंबाचा समावेश आहे का याचाही तपास केला जातोय. संभाजी वायभसे हा पोलिसांना नांदेड शहरात सापडला. काल त्याला ताब्यात घेतलं, रात्री त्याला बीडमध्ये आणलं, त्यानंतर त्याची चौकशी झाली. त्यानंतर सुदर्शन घुले सुधीर सांगळे या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आला आहे.
बीडच्या सरपंच हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले यांना आर्थिक मदत करणाऱ्या एका डॉक्टरला त्याच्या वकील पत्नीसह विशेष तपास पथनेका नांदेड मधून अटक केली आहे. या अटकेमुळे संतोष देशमुख हत्याकांडाच्या तपासाला चांगलाच वेग आला आहे. आता एसआयटीने नांदेड येथून सुदर्शन घुले याला अटक करणाऱ्या एका डॉक्टरला त्याच्या वकील पत्नीसह अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संभाजी वायबसे असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टर संभाजी वायभसे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी वायभसे यांनी सुदर्शन घुलेशी संपर्क साधला होता. विशेषतः त्यानेच आरोपींना पळून जाण्यात मदत केली होती. एवढेच नाही तर आरोपींना पळून जाण्यासाठी त्यानेच पैसे पुरवल्याचा आरोप आहे.