सोनम वांगचुग सारख्या व्यक्ती जाणं हेच सरकारला हवं; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Uddhav Thackeray serious allegation against BJP ठाकरेंनी भाजपवर सोनम वांगचुग यांच्या नीटमधील गैरप्रकाराविरूद्धच्या उपोषणावरून गंभीर आरोप केले

Uddhav Thackeray Serious Allegation Against BJP

Government actually wants Persons like Sonam Wangchuk to leave Uddhav Thackeray levels a serious allegation against BJP government : अयोध्येतील राम मंदीरातील कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणावर आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद आहे. यावेळी त्यांनी त्याच्या आगामी राम रक्षा आंदोलनाबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी दिल्लीत सुरू असलेलं सोनम वांगचुग यांचं नीट परिक्षेतील गैरप्रकाराविरूद्धच्या उपोषणावरून भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मुंबईतील राम रक्षा पठण कार्यक्रमानंतर नागपूरमध्ये देखील राम रक्षा पठण कार्यक्रम होणार आहे. तिथे मी स्वत: जाणार आहे. कारण आता हिंदुंनी जाग झालं पाहिजे. हिंदुत्वाचा वापर करून लुटण्याचा कार्यक्रम कुणी करत असले तर त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. सध्या देशात विचित्र परिस्थिती असून बऱ्याच वर्षांनंतर विरोधकांना काम आहे. कारण जिथे बोट दाखवू तिथे भ्रष्टाचार सुरू आहे. रस्त्यावर खड्डे आहेत. मात्र रस्ते करण्याचं ज्याचं कां आहे ते नितीन गडकरी हे इथेनॉलवर बोलत आहेत.

किराणा, कपडे अन् मोबाईल, लोकांचा पैसा नेमका कुठे खर्च होतो? केंद्र सरकार करणार मोठा सर्व्हे

म्हणून आम्ही आता ठरवलं आहे की, प्रत्येक एकाच विषयसाठी पत्रकार परिषद घ्यायची. त्यात आज घेतलेला विषय महिनाभरापासून सुरू आहे. पण तो लोकांपर्यंत पोहचलेला असूनही लोक त्यावर बोलत नाहीयेत. तो विषय म्हणजे दिल्लीत सोनम वांगचुग यांनी नीट परिक्षेतील गैरप्रकाराविरूद्ध सुरू केलेलं उपोषण. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण लोक त्याकडे म्हणावे तेवढं लक्ष देत नाहीत. आम्ही मात्र या उपोषणाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

यानिक सिनरने सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन विजेता; उपांत्यमध्ये जोकोविच अन् फायनलमध्ये फ्रेंच ओपन विजेत्याला हरवलं

ते मला मागच्या महिन्यात भेटून गेले. त्यांचा मला प्रचंड आदर आहे. त्यांच्या बुद्धीमत्तेचा देशाने उपयोग करून घ्यायला हवा. पण अशा व्यक्तीलाही देशद्रोही ठरवून तुरूंगात टाकलं जात आहे. आज तीच व्यक्ती 16 दिवसांपासून उपोषणाला बसली आहे. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. मी तिकडे अरविंद सावंतांना पाठवलं होतं. तसेच त्यांना मी फोन करून सांगितलं की, प्राणांतिक उपोषण करू नका तुमच्यासारख्या व्यक्ती देशाला हव्या आहेत. कारण सरकारला काही फरक पडत नाही. अशा एक-एक व्यक्ती जाव्यात असंच सरकारला वाटतं. त्यामुळे देशात एक तरी विषय असा असावा ज्यावर देसातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवं.

follow us