ग्रो मोअरचे धागे दोरे लांबवर, पोलिसानंतर साई संस्थानचे कर्मचारीही निलंबित; मंत्री विखेंकडून दखल

Grow More’s threads after police, Sai Sansthan employees are also suspended; Minister Vikhen takes note : गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी ‘ग्रो मोअर इन्व्हेसमेंट फायनान्स’ कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे लांबवर पसरलेले असल्याचं समोर येत आहे. कारण या प्रकरणातील आरोपीकडून खंडणी घेतल्याच्या आरोपानंतर पोलिस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं आहे. त्यानंतर आता साई संस्थानचे कर्मचारीही निलंबित करण्यात आले आहेत.
पोलिसानंतर साई संस्थानचे कर्मचारीही निलंबित…
शिर्डीतील ‘ग्रो मोअर इन्व्हेसमेंट फायनान्स’ कंपनीने गुंतवणूकदारांना फसवत साडेतीनशे कोटींचा घोटाळा केला आहे. त्यात शिर्डीसह जिल्ह्यातील अनेक लोकांचे पैसे गुंतलेले आहे. यामध्ये आता थेट साई संस्थानचे कर्मचारी दलाली करत असल्याचं समोर आलं आहे. या चारही कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची दखल स्वत: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे.
घोटाळ्याची फाईल ते अत्याचाराचे प्रकरण…, ठाकरेंचा पदाधिकारी अडचणीत
त्यामध्ये आता मुख्य आरोपी भूपेंद्र पाटीलसर सर्व दलालांचे गेल्या वर्षभरातील कॉल रेकॉर्ड तपासले जाणार आहेत. तसेच याबाबत ज्यांच्या कुणाच्या तक्रारी दाखल करायचे असेल त्यांना अहिल्यानगरला न जात स्थानिक पोलिसांकडेच देता येईल. तसेच त्यांची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे. याबाबत बोलताना मंत्री विखे म्हणाले की, या अगोदर श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव तालुक्यात अशा घटना घडल्या होत्या तरी देखील लोकांनी अधिक परताव्याच्या लालचीने पैसे गुंतवले. तसेच आता या प्रकरणामध्ये महसूल विभागाला देखील या आरोपीने काही जमीन खरेदी केली आहे का? अशी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.