शिवजन्मोत्सवानिमित्त जाणून घ्या महाराजांच्या जाज्वल्य अभिमान देणाऱ्या गडकिल्ल्यांविषयी…

History of Chhatrapati Shivaji Maharaj Fort on Shivjayanti 2025 : छत्रपती शिवरायांचं स्वराज्य म्हटलं की, गड किल्ल्यांचं वैभव आलंच या गड किल्ल्यांना महाराजांनी केवळ जिंकून घेतलं नाही. तर त्यांचं वैभव वाढवलं. नवीन किल्ल्यांची निर्मिती केली आणि सर्वसमावेशक अशा स्वराज्याच्या निर्मिती केली. त्याच स्वराज्याची पायाभरणी ठरणारे ते कळस चढवणाऱ्या किल्ल्यांविषयी जाणून घेऊ सविस्तर…
शिवनेरी :
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला. तो किल्ला म्हणजे शिवनेरी. पुणे जिल्ह्यातील जुन्नर या ठिकाणी हा किल्ला आहे. इसवी सन 1595 मध्ये मालोजीराजे भोसले यांनी बहादूर निजामशाहाकडून हा किल्ला जिंकला होता. त्यावेळी या किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर होतं. त्या देवीच्या नावावरूनच या किल्ल्याला शिवनेरी हे नाव देण्यात आलं.
प्रत्येक राज्याच्या राजधानीत होणार बालाजी मंदिर; मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडूंची घोषणा
तोरणा किल्ला :
त्यानंतर तोरणा किल्ला याच तोरणा किल्ल्याला प्रचंड गड असे देखील म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतल्यानंतर पहिल्यांदा जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला, जो किल्ला जिंकून महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा तोरण बांधलं म्हणूनच या प्रचंड गडला नंतर तोरणा किल्ला असं नाव पडलं. असंही सांगितलं जात.
जयंतराव फार विचार करू नका… पक्षप्रवेशांच्या चर्चांवर गडकरी काय म्हणाले?
राजगड (प्रथम राजधानी) :
राजगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी होती. हा किल्ला जिंकून महाराजांनी त्याची डागडूजी केली होती. तर याच किल्ल्यावर महाराजांना छत्रपती ही पदवी देण्यात आली. हा किल्ला पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे ज्याचे नाव अगोदर रायरी असं होतं.
रायगड (मुख्य राजधानी) :
तर रायगड हा महाराजांनी प्रचंड विस्तार केलेल्या मराठा साम्राज्याची राजधानी होती. हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगेमध्ये असून सध्याच्या रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्याचे नाव घेताच प्रथम रायगडाची आठवण येऊ लागते. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार ठरला.
पहिल्यांदा भेट अन् नंतर प्रेम, टोकियो ऑलिंपिक चॅम्पियन नीरज चोप्राने सांगितली त्याची लव्ह स्टोरी
सिंहगड :
पुण्याजवळील सिंहगड म्हणजेच पूर्वीचा कोंढाणा किल्ला. या किल्ल्याचा इतिहास अत्यंत ज्वलंत आणि युद्धाचा आहे. स्वराज्यासाठी हा किल्ला ताब्यात असणे अत्यंत महत्त्वाचे होते त्यामुळे नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या भावाने हा किल्ला जिंकला होता ज्यामध्ये ते धारार्थी पडले. याच प्रसंगामुळे गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाल्याने या किल्ल्याला नाव सिंहगड देण्यात आलं.
प्रतापगड :
प्रतापगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील एक अविस्मरणीय स्थळ आहे. याच किल्ल्यावर 1659 रोजी महाराजांनी आदिलशाहीचा सरदार अफजल खानाचा वध केला होता. सध्याच्या महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणापासून अवघे 24 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. तसेच या किल्ल्याच्या बांधकामाची खासियत म्हणजे इतर किल्ल्यांपेक्षा सर्वात मजबूत तटबंदी या किल्ल्याला असून वायव्य कडे तर 800 फुटाहून अधिक उंच अशी तटबंदी बांधले आहे.
पन्हाळा :
पन्हाळा किल्ल्याचे महत्व म्हणजे महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीतील 500 पेक्षा जास्त दिवस या किल्ल्यावर घालवले आहेत. बाजीप्रभू देशपांडे धारार्थी पडलेल्या पावनखिंडच्या लढाईत पन्हाळा किल्ला केंद्रस्थानी होता. त्यानंतर कोल्हापूर संस्थांच्या संस्थापक राणी ताराबाई देखील या किल्ल्यावर होत्या. त्यामुळे या किल्ल्याने अनेक उलथापालथी पाहिल्या आहेत. हा किल्ला डोंगरी किल्ल्यांपैकी एक आहे. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
विशाळगड :
पन्हाळ्याबरोबरच विशाळगड देखील महाराजांच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. 1659 मध्ये महाराजांनी हा किल्ला जिंकला त्यावेळी अत्यंत अवाढव्या असलेल्या या किल्ल्याला विशाळगड असेच नाव देण्यात आले. ज्यावेळी पन्हाळगडावर महाराज असताना आदिलशाहीचा सरदार सिद्धी जौहरने टाकलेल्या वेढ्यातून महाराजांनी सुटका करून विशाळगडावर पोहोचले. कोल्हापूर पासून वायव्येस 76 किलोमीटर अंतरावर हा किल्ला वसलेला आहे.
सिंधुदुर्ग :
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक किल्ले बांधले. त्यात त्यांना जलदुर्ग असणे स्वराज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने गरजेचे होते. त्यातीलच महत्त्वाचा असा जलदुर्ग स्वराज्याच्या सीमांचे रक्षण करत होता. त्या ठिकाणी महाराजांचं आरमार होतं. हा किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग अरबी समुद्राच्या कुर्ते बेटावर 1664 ते 1667 च्या दरम्यान हा किल्ला बांधण्यात आला. समुद्रातील किल्ला म्हणून त्याला सिंधुदुर्ग असे नाव देण्यात आलं.