अण्णा बनसोडे यांना कापलेले तिकीट कसे मिळाले? जयंत पाटलांनी किस्सा रंगवून सांगितला घ्या

Anna Bansode : पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांची आज महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अण्णा बनसोडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कट्टर समर्थक मानले जातात. आज त्यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने विधानसभेत अभिनंदन प्रस्तावर चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अण्णा बनसोडे यांना कापलेला तिकीट पुन्हा कसे मिळाले याबाबतचा किस्सा सांगितला.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, अण्णा बनसोडे यांनी महानगर पालिकेत स्थायी समितीवर काम केल्यानंतर मागच्या वेळी ते विधानसभेत निवडणून आले आहे. अजितदादा आणि आम्ही मिळून मुंबईत त्या मतदारसंघासाठी दुसरे नाव निश्चित केले होते मात्र त्यानंतर दादा पुण्यात गेले आणि तिकडे काही लोकांनी दादांचा घेराव घातला आणि मतदारसंघातून तिकीट बदलून अण्णा बनसोडे यांना तिकीट देण्याची मागणी केली तेव्हा अजित पवार यांनी मला फोन केला आणि आम्ही याबाबत चर्चा केली.
मी अजितदादांना सांगितले की, तुमचा जिल्हा आहे तुम्ही निर्णय घ्या आणि त्यानंतर एबी फॉम अण्णा बनसोडे यांना देण्यात आला असं जयंत पाटील अभिनंदन प्रस्तावर चर्चा करताना म्हणाले.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, जेव्हा अण्णा बनसोडे निवडून आले तेव्हा मी एकदा त्यांच्या कार्यलयात गेलो होतो. त्यांच्या कार्यलयातून लोकांना सर्व सेवा देण्यात येतात असं देखील ते यावेळी म्हणाले. तसेच दलित समाजाच्या आणि एका सामान्य घरातील माणसाला उपाध्यक्ष पदी संधी दिल्यामुळे जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील कौतुक केले.
तर यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी निवडणूक घेण्याची मागणी देखील जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली. आम्ही भास्कर जाधव यांचं नाव या पदासाठी दिला असून आज सभागृह संपेपर्यंत तुम्ही त्यांच्या नावाची घोषणा विरोधी पक्षनेते पदासाठी करा असेही यावेळी जयंत पाटील म्हणाले.