Farmer News : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खते खरेदी करू नका, IFFCOचा शेतकऱ्यांना सल्ला

मुंबई : ऑनलाइन विक्रीमुळे बनावट पद्धतीचे खते (Bogat Fertilizers) आणि औषधे शेतकऱ्यांना (Farmer) दिले जात असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जागतिक स्तरावरील सर्वात मोठी खतांची सहकारी संस्था असलेल्या इफकोने (IFFCO) एक प्रसिद्धी पत्रक जारी करत इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खते खरेदी न करण्याचा सल्ला दिलाय.
निर्बंध लादलेल्या बॅंक ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार
IFFCOने सर्व शेतकऱ्यांना तसेच सहकारी संस्था, खरेदीदार आणि किरकोळ विक्रेत्यांना स्पष्ट सांगितलंय की, कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला IFFCO ची उत्पादने विकण्याचा अधिकार नाही.
…तर IFFCO जबाबदार नसणार
IFFCO च्या प्रसिध्दी पत्रकात म्हटलंय की, या अनधिकृत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून कोणतेही खतं किंवा इतर उत्पादन खेरदी केल्यास ती पूर्णत त्या शेतकऱ्याची, खरेदीदाराची जबाबदारी असेल. हे प्लॅटफॉर्म खरेदीदारांना फसवतात, गैरवाजवी किंमत आकारतात आणि रद्द झालेली उत्पादने विकतात. त्यामुळं शेतकऱ्यांची वा खरेदीदारांची फसवणूक झाल्यास यात IFFCO जबाबदार नसेल.
तसेच ऑनलाइन खतविक्रीच्या नियमांनुसार, IFFCO ची उत्पादने विकण्यााठी आवश्यक असलेला एफसीओ परवाना विक्रेत्यांकडे नसेल किंवा IFFCO कडून अनिवार्य असलेला ‘O’ फॉर्म नसलेल्या कोणत्याही संस्थेविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार, असा इशाराही IFFCOने दिलाय.
IFFCOने पुढे स्पष्ट केलंय की, केवळ IFFCO द्वारे अधिकृत केलेले किरकोळ विक्रेतेच IFFCO उत्पादने विकू शकतात.
IFFCOने शेतकरी आणि विक्रेत्यांना फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.खात्रीशीर विक्रेत्यांकडूनच IFFCO ची उत्पादने खरेदी करा, असं इफकोने म्हटलंय.
एक मोठा खुलासा
इतकी मजल ? आता हा घोटाळा आहे त्यात काहीच शंका नाही.
मी मंत्री धनंजय मुंडे यांचा कृषी घोटाळा सिद्ध करण्यासाठी मी Nano Urea आणि Nano DAP, हे पैसे भरून ऑनलाइन मागवले. ती डिलिव्हरी IFFCO ला सांगून थांबवण्यात आली?
हा घ्या पुरावा pic.twitter.com/CqNx9pFRuh
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 17, 2025
अंजली दमानियांचे मुंडेंवर आरोप
काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी विभागात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज दमानिया म्हणाल्या,
धनंजय मुंडे यांनी कृषी घोटाळा केल्याचं मी स्पष्ट म्हटलं होतं. नुसते आरोप नव्हते, तर त्याचे पुरावेही मी सादर केले होते. प्रत्येक गोष्ट ही ऑनलाइन वेबसाइटवर विकत मिळते. त्यानंतर मला वाटलं की, हे सर्व आपण विकत घ्यावे. मी नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीसाठी ऑनलाइन ऑर्डर दिली होती. मात्र, धनंजय मुंडे यांच्या दबावामुळे ऑनलाइन कंपनीने ऑर्डर थांबवल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच
हा धनंजय मुंडेंचा घोटाळा आहे, हे मी खात्रीने सांगू शकते, असं दमानिया म्हणाल्या.