मला गोडसेंचे विचार मांडण्याचा अधिकार, हल्ल्यांना पाठबळ देणाऱ्या थोरातांनी आत्मपरिक्षण करावं; कीर्तनकार भंडारे आक्रमक

Kirtankar Sangram Bapu Bhandare Aggressive on Balasaheb Thorat for Attack in Kirtan : अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर शहरातील घुलेवाडी येथे हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराजांनी कीर्तनामधून राजकीय आणि धार्मिक विषयावरती भाष्य केलं. होतं त्यानंतर काहींकडून या ठिकाणी गोंधळ घालण्यात आला होता. गोंधळ घालणारे लोक हे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते असल्याचे म्हटलं गेलं. त्यानंतर थोरातांकडून देखील यावर टीका करण्यात आली. त्यावर आता पुन्हा एकदा संग्राम बापू भंडारे महाराजांनी थोरातांवर टीका केली आहे. तसेच नथुराम गोडसेंचा विचार मांडण्याचा अधिकार आहे म्हणत इशारा दिला आहे.
काय म्हणाले कीर्तनकार संग्राम बापू भंडारे?
16 ऑगस्ट 2025 ला अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमधील घुलेवाडी गावात माझं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. 9 वाजता माझं कीर्तन सुरू झालं. त्यावेळी मी संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण सुरू केलं. पण त्याठिकाणी काही लोक भांडण्यासाठीच आले होते. कीर्तनात साडे दहा वाजले तरी भांडण्यासाठी मुद्दाच भेटेना. त्यामुळे एका व्यक्तीने साडे दाहा वाजेच्या सुमारास चालू कीर्तनामध्ये बडबड करायला सुरूवात केली. मी त्याला शांत बसण्याची विनंती देखील केली. त्यानंतर ती व्यक्ती जेव्हा उभ राहून बडबड करू लागली. तेव्हा मी सहकाऱ्यांना या व्यक्तीची काही तरी मानसिक समस्या असल्याचं सांगितलं. यांना बाजुला न्या म्हटलं. त्यावर पाच सहा सहकारी आक्रमक झाले. माझ्यावर धावून येण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण आमचे भगव्या टोप्या घातलेले पाच पन्नास हिंदुत्त्ववादी सहकारी तेथे उपस्थित होते. त्यांनी त्यांना जागेवर रोखलं. पण आमचे हिंदुत्त्ववादी सहकारी तेथे उपस्थित नसते तर संग्राम बापू भंडारे आज महान असता.
तसेच मी नथुराम गोडसेंचा विचार वारकरी सांप्रदायाच्या व्यासपीठावर अद्याप मांडलेला नाही. पण मी तो मांडू शकतो. कारण मला तो अधिकार संविधानाने दिला आहे. पण मी बाळासाहेब थोरातांना अंतर्मुख करण्यासाठी त्यांनी माझ्याविरोधात जे चुकीचा व्हिडीओ पसरवला. साहजिकच हल्ला झाला आणि विरोध तर होणारच या वाक्याचं खंडन करण्यासाठी मी त्यांना अंतर्मुख करावं. त्यांनी हल्ल्याचं गांभीर्य समजून घ्यावं. असं जर आपण हल्लेखोरांना पाठबळ दिलं तर संगमनेर पेटल.आम्ही हल्ले केल्यानंतर बाळासाहेब थोरात आमच्या पाठीशी उभे राहतात. असं नॅरेटीव्ह सेट झालं तर पोरं कुणावरही हल्ले करतील. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी एकांतात बसावं आणि आत्मपरिक्षण करावं की, काय केलंय आपण, कुठे चाललो आपण? तुम्ही 40 वर्षे नेतृत्व करता आणि आज एका धर्म कीर्तनकारावर तुटून पडत आहात.
नेमकं काय घडलं होत?
संगमनेरच्या घुलेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हभप संग्राम बापू भंडारी महाराजांनी राजकीय भाष्य केले. तसेच धार्मिक विषयांवरही भाष्य केले. हिंदू-मुस्लिम विषयांवरती भाष्य करत असताना भंडारे महाराजांना उपस्थित गर्दीमधील काहींनी अभंगावर निरूपण करा इतर मुद्द्यांवर नको अशी मागणी केली. यावरून उपस्थित असलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले. कीर्तनामधून सुरू असलेले राजकारण व धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्यावरून काहींनी आक्षेप घेतला. मात्र हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झाल्याने दोन गटांमध्ये यावेळी तुफान राडा झाला. महाराज मंचावरून निघून जात असताना काहींनी धक्काबुक्की केल्याचं देखील यावेळी सांगण्यात येतआहे. महाराजांच्या वाहनांची तोडफोड देखील करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. घटनास्थळी तातडीने पोलीस प्रशासन दाखल झाले व पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाद मिटला पोलिसांनी तातडीने गोंधळ घालणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. तसे संगमनेरचे आमदार अमोल खताळ देखील या प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी महाराजांवरील असे हल्ले आम्ही खपवून घेतले जाणार नाही. अशा शब्दांत इशारा देखील दिला.